Showing posts with label बातम्या. Show all posts

पत्रकार सुनील ढेपे यांच्यावरील खोटा गुन्हा औरंगाबाद खंडपीठाकडून रद्दबातल

तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना न्यायालयाने फटकारले 


धाराशिव   - धाराशिवचे झी २४ तासचे तत्कालीन रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी सडेतोड लेख लिहून तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांचे वाभाडे काढले म्हणून उस्मानाबादचे पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल  ठरवला आहे. हा  निकाल न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकनवाडी व राजेश पाटील यांनी दिला. 


 सन 2020 मध्ये 10, 11 आणि 12 जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. या साहित्य संमेलनात झी २४ तासचे तत्कालीन रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी पत्रकार सुनील ढेपे यांनी सोशल मीडियावर सडेतोड लेख लिहून तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांचे वाभाडे काढले होते. 'बिहारी बाबू , आता तरी जागे व्हा ' असे त्या लेखाचे हेडिंग होते.


ही पोस्ट ढेपे यांचे मित्र बाळासाहेब सुभेदार यांनी सोशल मीडियावर शेयर केली होती.  त्यामुळे पोलिसांनी चिडून पत्रकार सुनील ढेपे यांच्यासह  सुभेदारविरुद्ध आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दि. १४ जानेवारी २०२० रोजी  पोलीस ( अप्रितीची भावना चेतवने)  कायदा 1922 चे  कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात  दोषारोपपत्र  दाखल केले होते. हा खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंध महाराष्ट्रात पत्रकारांनी संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला होता. 


या एफआयआर आणि चार्जशीटला पत्रकार सुनील ढेपे यांनी  ॲड. सुशांत चौधरी यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्याच्या औरंगाबाद खंडपीठात दि. 16/02/2021 रोजी आव्हान दिले होते. कोरोनामुळे या आव्हान याचिकेची सुनावणी लांबणीवर पडली होती. पण दीड वर्षानंतर या आव्हान याचिकेचा दि. ३ ऑगस्ट २०२२ रोजी निकाल लागला असून, न्यायालयाने एफआयआर आणि चार्जशीट रद्दबातल ठरवले आहे आणि पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. 


काय म्हटले आहे न्यायालयाने ?

# तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना सदर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा कोणताही अधिकार नव्हता...


# पत्रकार सुनील ढेपे यांनी लिहिलेल्या बातमी मधील संपूर्ण मजकूर हा तक्रारीमध्ये न घेता आपल्याला पाहिजे तेवढाच भाग तक्रारी मध्ये घेतला गेला , हे योग्य नाही.


# तपासामध्ये जे जबाब घेतले ते फक्त पोलीस दलामधील व्यक्तींचे घेण्यात आले व त्यातील काही व्यक्तींनी बातमी देखील वाचली नव्हती.


# सदरील बातमी वाचून पोलिसांमध्ये शासनाविरुद्ध कोणतीही अप्रीतीची भावना निर्माण होत नाही.


# अर्जदाराच्या विरुद्ध केस चालवणे हे कायद्याचा दुरुपयोग केल्यासारखे होईल.


# पोलीस विभागाने साहित्य संमेलनाला जी पाच लाखाची देणगी दिली , त्याबद्दल पत्रकारांने विचारणे हा पत्रकारांचा अधिकार असून त्याबद्दल कोणाला बदनामी झाली असे वाटणे योग्य नाही.


# राज तिलक रौशन हे सन 2016 मध्ये उस्मानाबादला अतिरिक्त पोलिस अधीक्षक असताना पत्रकारावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्या संदर्भात बातमीत असलेला उल्लेख हा बदनामीकारक असू शकत नाही.


पत्रकारानी पोलिसांविरुद्ध सत्य लिहिले की , पोलीस ब्रिटिशकालीन कलम पोलीस (अप्रितीची भावना चेतवने) कायदा 1922 चे कलम ३ चा गैरवापर करून पत्रकाराविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करतात, त्रास देतात. त्यामुळे हे कलम कायमचे रद्द करावे, यासाठी आपण लढा देणार असल्याचे पत्रकार सुनील ढेपे यांनी सांगितले तसेच ज्या पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्याविरुद्ध उस्मानाबाद न्यायालयात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले. 


या निकालामुळे महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांना दिलासा मिळणार आहे. पत्रकार सुनील ढेपे यांची न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणारे उस्मानाबादचे सुपुत्र ॲड. सुशांत चौधरी यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

हातात पेन घेऊन कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस संपले - सुनील ढेपे


शिर्डी - हातात पेन घेऊन कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले असून, पत्रकारांनी काळाबरोबर स्वतःला अपग्रेड केले पाहिजे, सध्याचे युग डिजिटल मीडियाचे असून, फाईव्ह जी सुरु झाल्यानंतर मीडियात आणखी क्रांतिकारक बदल होतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांनी येथे केले. 


महाराष्ट्र पत्रकार संघाचे १८ वे अधिवेशन शिर्डी येथे पार पडले. यावेळी 'डिजिटल मीडिया - पत्रकारासाठी एक संधी' या विषयावर  ढेपे बोलत होते. व्यासपीठावर पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे - पाटील , माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे , साधना न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक पुरुषोत्तम सांगळे , भाजपचे प्रवक्ते आणि माजी न्यूज अँकरअजित चव्हाण आदी उपस्थित होते.


कागदाचे वाढलेले भाव आणि एकदंरीत खर्च यामुळे येत्या तीन वर्षात अनेक वृत्तपत्रे बंद पडून त्याची जागा ईपेपर घेतील, पण यापुढे ईपेपर वाचण्यासाठी पैसे मोजावे लागतील.  सध्या चालू असलेल्या न्यूज चॅनलला देखील घरघर लागेल आणि स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून अनेक डिजिटल चॅनल उदयास येतील.  डिजिटल मीडिया हेच भविष्य असल्याने पत्रकारितेत कार्यरत असलेल्या प्रत्येकाला डिजिटल मीडियाचे सर्व ज्ञान असायला हवे, असेही ढेपे यांनी सांगितले. 

 


यावेळी बोलताना पत्रकार पुरुषोत्तम सांगळे म्हणाले की, सोशल मीडियामुळे पत्रकारांची मक्तेदारी संपली असून, आज प्रत्येकजण पत्रकार झाला आहे.मालक लोकं जोपर्यंत पत्रकारांच्या हिताचा विचार करत नाही, तोपर्यंत पत्रकारांच्या पोटापाण्याचा मूळ प्रश्न सुटणे अवघड आहे.त्रकारांचा प्रतिनिधी विधिमंडळात गेला पाहिजे, पण त्यासाठी राज्यातील दोन लाख पत्रकार एकत्र यावे लागतील. पत्रकार संघटनांचे सवतेसुभे मोडित काढावे लागतील. 


या अधिवेशनास राज्य संपर्कप्रमुख संजय नवले , नगर जिल्हा पत्रकार संघाचे सचिव हरिभाऊ मंडलिक ,  अकोला तालुका अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे संगमनेर तालुका प्रमुख अनिल शेठ चांडक,बाबासाहेब राशिनकर आदी उपस्थित होते. 


यांना मिळाला पुरस्कार 


श्री सुनील ढेपे -राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार, श्री सागर कोते-राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार,सौ.इंदुबाई सुनील सांगळे-राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार,श्री गौराम दादा खुळे-राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार,श्री मनोहर किसन पोकळे -राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार, वेदांत बिल्डकॉन,सिन्नर -राज्यस्तरीय उद्योगभूषण पुरस्कार,श्री प्रकाश कळसगोंडा- राज्यस्तरीय उपसरपंच भूषण पुरस्कार,श्री विरभद्र पोतदार- राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार,सौ.वर्षा पर्शुराम ढेकणे-राज्यस्तरीय महिलारत्न पुरस्कार, श्री देवेंद्र राजपूत -राज्यस्तरीय नवरत्न कृषी व सामाजिक पुरस्कार,डॉ.चंद्रशेखर गवळी-राज्यस्तरीय वैद्यकीय रत्न पुरस्कार,श्री दिपक तोष्णीवाल- राज्यस्तरीय उद्योग भूषण पुरस्कार,सौ.लता विलासराव जायभाये-राज्यस्तरीय उद्योगश्री पुरस्कार, श्री बापुसाहेब हुंबरे- राज्यस्तरीय संपादकरत्न पुरस्कार, श्री तुकाराम तळतकर-राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार, सौ.छाया शिवनाथ मस्के-राज्यस्तरीय महिलारत्न पुरस्कार, सौ.हेमलता रमेश कुंभार-राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार,सौ.सुरेखा दिपक पाटील- राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार, श्री दशरथ खैरनार- राज्यस्तरीय आदर्श उद्योगरत्न पुरस्कार, स्नेहल संदिप पवार- राज्यस्तरीय महिला उद्योजिका पुरस्कार, श्री प्रकाश घोडके व सौ.पुष्पलता घोडके -राज्य.आदर्श माता -पिता पुरस्कार  


स्वर्गाची सुंदरी, नवरी नटली नंतर राहुल शिंदेचं आलं अणदूर - नळदुर्गच्या खंडोबावर लोकप्रिय गाणं


उस्मानाबाद  - स्वर्गाची सुंदरी, नवरी नटली , पुण्याचा राघू आदी लोकप्रिय गाणे गाणाऱ्या गायक राहुल शिंदे यांचं  खंडोबावर नवीन दमदार गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि नळदुर्गच्या  श्री खंडोबा आख्यायिकेवर पत्रकार सुनील ढेपे यांनी  हे गाणं लिहिले आहे. 


अणदूर आणि नळदुर्ग हे दोन वेगवेगळे गावे असली तरी श्री खंडोबाची मूर्ती एकच आहे. अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावणे दोन महिने श्री खंडोबाचे वास्तव असते. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह याच ठिकाणी झाला आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राला अनन्य साधारण महत्व आहे. 


याच खंडोबा आख्यायिकेवर पत्रकार सुनील ढेपे यांनी 'बघा माझा खंडोबा कसा डोलतो' हे  भक्तीगीत लिहिले असून, गायक राहुल शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजात हे गायलं आहे.सहगायक म्हणून शाहीर बापु पवार आणि सचिन अवघडे यांनी भाग घेतला आहे. उस्मानाबाद लाइव्ह आणि मुक्तरंग म्युझिक चॅनलने हे गाणं रिलीज केले आहे. 



अणदूरच्या श्री खंडोबाची यात्रा ५ डिसेंबर रोजी आहे. त्यानंतर श्री खंडोबाचे नळदुर्गमध्ये आगमन होते, त्यानंतर दर रविवारी यात्रा तर पौष पौर्णिमेला महायात्रा भरते , दर रविवारच्या यात्रेला किमान २० ते ३० हजार भाविक आणि महायात्रेला ५ लाख भाविक येत असतात. कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा झाली नसली तरी यंदा यात्रा नेहमीप्रमाणे भरण्याची शक्यता आहे. 


युट्युब लिंक 



मी माहिती भरली, तुम्हीही भरा...





ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियावर नियंत्रण आणण्याच्या हालचालीनंतर केंद्र सरकारने आता देशभरातील न्यूज वेबसाईट्सवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देशभरातील प्रत्येक न्यूज वेबसाइट्सची, त्याचे संपादक-संचालक यांची कुंडली जमाविण्यास सुरुवात झाली आहे. "आईटी एक्ट 2021च्या नियम 18 अनुसार, डिजिटल मीडिया पब्लिशर्स कडून ही माहिती मागवली जात आहे. 

केंद्र सरकरच्या नव्या नियमाचे मी स्वागत करतो. मी उस्मानाबाद लाइव्ह आणि पुणे लाइव्हची माहिती भरून पाठवली आहे. 

ज्यांनी न्यूज वेबसाईट सुरु केली, त्यांनी माहिती भरून पाठवावी. १५ दिवसाच्या आत माहिती भरून पाठवायची आहे. 



- सुनील ढेपे 
  संपादक, 
उस्मानाबाद लाइव्ह 
पुणे लाइव्ह 
9420477111

खेमका नावाच्या खमक्या अधिकारी सोबत ...



हरियाणा सरकार मध्ये अशोक खेमका नावाचे कडक शिस्तीचे सनदी अधिकारी आहेत, ते सध्या प्रधान सचिव आहेत.

महाराष्ट्रात तुकाराम मुंडे जसे आहेत, त्यापेक्षा किती तरी पटीने कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानी अनेक प्रकरणात कारवाई केली आहे, त्यामुळे त्यांची 28 वर्षात 56 वेळा बदली झाली आहे.

खेमका यांच्या हस्ते आमचे खास मित्र बाळासाहेब सुभेदार यांना पुण्यातील सजग नागरिक मंचच्या वतीने सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला, कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांच्या सोबत बाळासाहेब , मी आणि मंचचे मोजके अधिकारी यांनी स्नेहभोजन घेतले, दोन तासाच्या सहवासात अनेक विषयावर चर्चा झाली!


प्रधान सचिव असूनही त्यांच्यातील साधेपणा मला भावला !

- सुनील ढेपे, संपादक, उस्मानाबाद लाईव्ह


#Ashok_Khemka

मेन स्ट्रीमचा पत्रकार म्हणजे काय रे भाऊ ?


#बदलतं_माध्यम #कॅमेरा कोमात #मोबाईल जोमात


दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी "उस्मानाबाद लाइव्ह" वेबसाईट सुरु केली, तेव्हा याची वेबसाईट कोण पाहतंय आणि वाचतंय म्हणणारे तथाकथित पत्रपंडित आज स्वतःची वेबसाईट सुरु करताहेत...

पाच वर्षांपूर्वी जेव्हा - जेव्हा पत्रकार परिषद असे, तेव्हा मी मोबाईलवर शुटिंग करताना कुत्सित मनाने हसणारे टीव्ही मिडीयाचे रिपोर्टर आज स्वतःच मोबाईलवर शुटिंग करताहेत..

हा का मेन स्ट्रीमचा पत्रकार आहे का ? म्हणणारे आज जॉब केल्यानंतर मानसिक अवस्था बिघडल्यासारखे झालेत...

तेव्हा मित्रानो, कुणाला कमी समजू नका... काळ बदलत आहे... काळाबरोबर चला...

- सुनील ढेपे, संपादक, उस्मानाबाद लाइव्ह

5 G सुरु झाल्यानंतर मीडियात मोठी क्रांती होणार – ढेपे

नवी मुंबई - येत्या दोन वर्षात 5 G सुरु होईल, त्यावेळी मीडियात मोठी क्रांती होईल. अनेक वृत्तपत्रे बंद पडून त्याची जागा ईपेपर घेतील तर टीव्ही चॅनल्स बंद पडून ओटिटी चॅनल्स सुरू होतील, असे प्रतिपादन पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांनी येथे केले.
नवी मुंबईतील कोकण भवन मध्ये विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा पार पडली, यावेळी डिजिटल मीडिया व होणारे बदल या विषयावर ढेपे बोलत होते.यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे, उपसंचालक डॉ. गणेश मुळे, युवा पत्रकार हर्षल भदाणे आदी उपस्थित होते.

कागदाचे वाढलेले भाव, होणारा खर्च आणि येणारे जाहिरात उत्पन्न याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. त्यात घरोघरी वाटप करणाऱ्या वितरकांनी संख्या कमी होत आहे. त्यामुळे वृत्तपत्र व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे भविष्यात अनेक वृत्तपत्रे बंद पडतील, त्याची जागा ईपेपर घेतील. मात्र ईपेपर वाचण्यासाठी वाचकांना पैसे मोजावे लागतील. टीव्ही न्यूज चॅनल्स डीटीएच कंपन्या आणि केबल्सच्या वितरण खर्चामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे ओटिटी चॅनल्स सुरु होतील. त्याची सुरुवात सकाळ माध्यम समूहाने सुगरण चॅनल सुरु करून केल्याचेही ढेपे यांनी यावेळी सांगितले.

गेल्या दहा वर्षात डिजिटल मीडियात काय बदल झाले, 5 G सुरु झाल्यांनतर आणखी काय बदल होतील याचा ऊहापोह ढेपे यांनी सांगून भविष्यात न्यूज बेबसाईट, मोबाईल अँप, युट्युब चॅनल्स, सोशल मीडिया याचा दबदबा कसा राहील, यावर भाष्य केले.

माहितीच्या क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. आज कॅमेरा युगाचा अस्त होत असुन मोबाईल युग सुरु झाले आहे.ही एक नवीन क्रांती असुन या बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामकाजात करुन माहिती विभागाने अद्ययावत व्हावे असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी केले. कार्यशाळेचे सुत्रसंचालन ठाण्याच्या जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन माहिती अधिकारी राहुल भालेराव यांनी केले.


                                                                                                                     (26/02/2020)

डिजिटल मीडिया कार्यशाळेची क्षणचित्रे ...


स्थळ - पंकज इंगोले संचलित
कॅलिडस मीडिया अकॅडमी,
नळ स्टॉप, पुणे  


आज फक्त माझाच तास होता, तेही तब्बल तीन तास ....
हॉलची क्षमता फक्त 20, तितकेच हजर ...
एकट्याने फुल्ल बॅटिंग केली ....
लेक्चर देण्याचा फुल्ल कॉन्फिडन्स आला आहे....
दोन विद्यार्थी मुंबईहुन आले होते, काहींनी नोंदणी केली, पण काही अडचणीमुळे गैरहजर राहिले ....
प्रत्येक विद्यार्थ्यांला 800 रुपये फी, पण त्यांच्या चेहऱ्यावर पैसे फुकट गेले नाहीत, याचे समाधान होते, शेवटी मी फेसबुक लाइव्हचे प्रात्यक्षिक दाखवले, तेव्हा एका विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया बोलकी आहे...

पुण्यात आल्यानंतर बरेच काही शिकलो, आता पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना डिजिटल मीडियाचे ज्ञान देणे, सुरू केले आहे.
उस्मानाबादसारख्या ग्रामीण भागात 10 वर्षांपूर्वी जेव्हा वेबसाईट सुरू केली, तेव्हा अनेकांनी हेटाळणी केली होती, आता तेच मागे पडले, मी मात्र पुढे, अधिक पुढे जात आहे.
मी जे पूर्वी करत होतो, याला डिजिटल मीडिया म्हणतात ! ☺️ हे पुण्यात आल्यानंतर कळले, आता अधिक परिपक्व झालो आहे, पत्रकारिता विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक झालो आहे. आतापर्यंत पाच वेळा डिजिटल मीडिया कार्यशाळा झाली, प्रत्येक वेळी तीन ते चार गेस्ट असायचे, यावेळी फक्त आणि फक्त मी...
महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून निमंत्रण येत आहेत, मग भेटू आपल्या शहरात ....

सुनील ढेपे
9420477111

पत्रकार सुनील ढेपे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप

पुणे - महाराष्ट्र लाइव्हचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्याजवळील वडकी येथील परशुराम जगताप केंद्रीय अनु.जाती प्राथमिक आणि माध्यमिक निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले, तसेच फळफळावळ आणि बिस्किटे वाटप करण्यात आले,त्यानंतर त्यांना स्नेहभोजन देण्यात आले.
सुनील ढेपे युवा मंचचे अध्यक्ष व पत्रकार चंद्रशेखर भांगे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते, कार्यक्रमास शाळेचे संस्थापक मोरे, मुख्याध्यापक मोराळे, तसेच अंबादास गोरे आदी उपस्थित होते.
प्रारंभी सुनील ढेपे यांच्या हस्ते केक कापण्यात आला, तत्पूर्वी पाच विद्यार्थीनी त्यांना औक्षण केले. यावेळी पत्रकार सुनील ढेपे यांनी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश कसे मिळवता येते हे स्वतःच्या अनुभवावरून सांगितले.
दहावी - बारावी परीक्षेत चांगले मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
गेल्या 17 वर्षांपासून विना अनुदानित असलेल्या वडकी येथील निवासी आश्रम शाळेत जवळपास दीडशे गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यानी पुढे यावे, असे आवाहन चंद्रशेखर भांगे यांनी केले आहे.


कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले - सुनील ढेपे

पुणे - हातात पेन घेवून कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले आहेत,  प्रत्येक पत्रकाराला बातमीबरोबर कॉम्प्युटर, इंटरनेट आणि अत्याधुनिक यंत्रणेचे ज्ञान हवे. जो पत्रकार    काळाबरोबर चालणार नाही तो पत्रकारितेतून कालबाह्य होईल,असा गर्भित इशारा ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे  यांनी दिला.
पुण्यातील कर्वे नगर रोडवरील  कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्ट्स अकॅडमी मध्ये तिसरी राज्यस्तरीय डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी पत्रकार ढेपे बोलत होते, यावेळी सकाळचे संपादक सम्राट फडणीस, पुढारी सिटी एडिटर विक्रांत पाटील, संचालक पंकज इंगोले उपस्थित होते.
ज्या पत्रकारास संगणकाचे ज्ञान नाही तो निरक्षर पत्रकार  ठरत आहे, आपण स्वतः  20 वर्षांपासून संगणक हाताळत असून, काळाबरोबर नाही चाललो असतो तर आऊटडेटेड पत्रकार ठरलो असतो, असे सांगून पत्रकार ढेपे म्हणाले की, वेबसाईट अपलोड करणे फार अवघड काम नाही, मात्र त्याचे टेक्निकल ज्ञान घेणे आवश्यक आहे, बातमी लिहून ती फुलवणे, आकर्षण हेडिंग देणे हेच महत्वाचे आहे.
न्यूज चॅनल आणि प्रिंट मीडिया मधील संधी कमी झाल्याने तरुण पत्रकारांनी डिजिटल मीडियाचे ज्ञान घ्यावे असे आवाहनही ढेपे यांनी केले .वेबसाईट आणि सोशल मीडियामधून आर्थिक प्राप्ती कशी होते, याच्या टिप्सही त्यांनी यावेळी सांगितल्या.
पंकज इंगोले, सम्राट फडणीस, विक्रांत पाटील, सुनील ढेपे
सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी इंटरनेटचा उगम, त्याची व्याप्ती, आवाका, भविष्यात काय होणार याबद्दल मार्गदर्शन केले, पुढारीचे सिटी एडिटर विक्रांत पाटील यांनी कंटेंट, गुगल सर्चर्निग,लोकांच्या आवडी निवडी याबाबद्दल माहिती दिली.
दुपारच्या सत्रात सामचे संपादक निलेश खरे यांनी युट्युब मॉनिटेशनबद्दल माहिती सांगितली तर लोकमतचे डिजिटल संपादक  तुळशीदास भोईटे यांनी, सोशल मीडिया कसा हँडल करावा, लोकांना नेमके काय  आवडते यावर भाष्य केले.
तुळशीदास भोईटे, सुनील ढेपे, निलेश खरे, पंकज इंगोले, विक्रांत पाटील
प्रास्ताविक  संचालक पंकज इंगोले यांनी केले.यापुढे कोल्हापूर, शिर्डी, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आदी ठिकाणी डिजिटल मीडिया कार्यशाळा घेण्याचा मनोदय  त्यांनी व्यक्त केला, त्यासाठी त्या त्या ठिकाणच्या पत्रकार संघांनी पुढे येण्याची गरज आहे असे इंगोले म्हणाले.


सुनील ढेपे यांना मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार प्रदान

उस्मानाबाद - मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि उस्मानाबाद लाइव्हचे मुख्य संपादक सुनील ढेपे यांना मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय कै.नागोजीराव दुधगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार ठाणे येथील एका भव्य आणि दिव्य कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी मराठवाड्यातील एका पत्रकारास राज्यस्तरीय कै.नागोजीराव दुधगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो.यंदाच्या पुरस्कारासाठी उस्मानाबाद लाइव्हचे मुख्य संपादक सुनील ढेपे यांना घोषित करण्यात आला होता.हा पुरस्कार ठाणे येथील गडकरी रंगायतन सभागृहात दर्पण दिनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकसत्ताचे माजी संपादक अरूण टिकेकर,ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. 










मागे वळून पाहताना...

मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था आहे.राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे पत्रकार भवन आहेत,ते याच संस्थेचे आहेत.ही संस्था स्थापन होवून आजमितीस ७७ वर्षे पुर्ण होत आहेत.या संस्थेचे अध्यक्षपद अनेक नामवंत पत्रकारांनी भूषविले आहे.
याच संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रतिष्ठेचे आणि मानाचे पुरस्कार दिले जातात.संपूर्ण मराठवाड्यातून एका पत्रकारास कै.नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार दिला जातो.यंदाच्या पुरस्कारांसाठी माझी निवड करण्यात आली आहे.त्याबद्दल संस्थेचे माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख,किरण नाईक यांच्यासह सर्व पदाधिका-यांचा आभारी आहे.
माझ्या पत्रकारितेस २५ वर्षे पुर्ण झाली आहेत.वयाच्या १९ व्या वर्षी पत्रकारितेस सुरूवात केली आणि २१ व्या वर्षी लोकमतच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पां.वा.गाडगीळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार मिळाला.नागपुरात तत्कालिन माहिती व प्रसारण मंत्री गिरीजा व्यास यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता.तो पहिला पुरस्कार होता.त्यानंतर एका पाठोपाठ एक २५ हून अधिक पुरस्कार मिळाले.सन २००४ मध्ये बाळशास्त्री जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार मिळाला.तत्कालिन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते जांभेकर यांच्या जन्मगावी म्हणजे पोंभुर्ले ता.देवगड जि.सिंधुदुर्ग येथे हा पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला होता.त्यानंतर सर्वात मानाचा हा पुरस्कार आहे.या पुरस्कारामुळे आनंद तर झाला आहेच परंतु तितकीच जबाबदारी वाढली आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावातून सन १९८७ पासून सुरू झालेला पत्रकारितेचा प्रवास अनेक संकटे झेलत इथंपर्यंत पोहचला आहे.मागे वळून पाहताना आपण काय होतो आणि काय झालो,याचे आत्मचिंतन केले की चेह-यावर आसू आणि हासू येतात.माझ्या घरात पत्रकारितेचा वारसा नाही.आई - वडील अशिक्षित.घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची.शिक्षणासाठी पैसे नव्हते म्हणून अणदूरच्या मुद्दाना शेट्टी यांच्या हॉटेलात एकेकाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत तीन रूपयावर दिवसभर काम केले.त्या आठवणी काढल्या की डोळे भरून येतात,परंतु गरीबीवर आणि सर्व संकटावर मात करत यशस्वी झालो,माझे जीवन म्हणजे एक कादंबरी आहे.अनेक मित्रांनी आत्मचरित्रावर कादंबरी लिहिण्याचा सल्ला दिला आहे.भविष्यात तो लिहिण्याचा मानस आहे.
पत्रकारिता ही चळवळ मानणा-यापैकी मी एक आहे.त्याचा कधी धंदा होवू दिला नाही.गरीबी काय असते आणि गरीबांचे प्रश्न काय असतात,या चाकोरीतून मी गेलो आहे.त्यामुळे कितीही यश मिळाले तरी गर्विष्ठ होत नाही आणि कितीही अपयश आले तरी खचून जात नाही.यश आणि अपयशाच्या पलिकडे मी गेलो आहे.संत ज्ञानेश्वरी आणि संत तुकाराम गाथा मी किती तरी वेळा वाचलेली आहे.त्यामुळे आयुष्यात कितीही संकटे आली तरी स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न केलेला आहे.
माझ्यावर ज्या ज्या वेळी संकटे कोसळली त्या प्रत्येकी वेळी कोणी ना कोणी देवासारखा धावून आलेला आहे.या जगात देव आहे की नाही हे मला माहित नाही,परंतु या जगात अनेक देवासारखी माणसे आहेत,हे मला माहित आहे.त्यामुळे या जगात सर्वजण वाईट आहेत,हा भ्रम मी कधी करून घेतलेला नाही.नेहमी सकारात्मक विचार ठेवून वाटचाल केलेली आहे.
असो,कै.नागोजीराव दुधगावकर पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक मित्र,हितचिंतक आणि मार्गदर्शकांनी फोन,एस.एम.एस.व्हॉटस एॅप,फेसबुक आणि प्रत्यक्ष भेटीत अभिनंदन करून ज्या शुभेच्छा दिल्या आहेत,त्याबद्दल सर्वांचे पुनश्च आभार...
सुनील ढेपे
संपादक,उस्मानाबाद लाइव्ह
www.osmanabadlive.com

रेडिओ धमालवर बनावट नोटा संदर्भात माझी बाईट

रेडिओ धमालवर बनावट नोटा संदर्भात माझी बाईट ऐका
ही बाईट दि.4 डिसेंबर 2014 रोजी सकाळी प्रसारीत झाली


येळकोट,येळकोट जय मल्हार...

झी मराठीवरील 'जय मल्हार' ही मालिका खूप लोकप्रिय झाली आहे.आज घराघरात सायंकाळचे सात वाजले की लोक टी.व्ही.समोर बसून 'जय मल्हार' मालिका आवडीने आणि भक्तीभावाने पहात आहेत.ही मालिका मी पण दररोज आवर्जुन पहात असतो.कधी चुकून कामाच्या व्यापामुळे वेळ निघून गेली तर रात्री साडेदहा वाजता ही मालिकेचा भाग दाखविला जातो,तेव्हा आवर्जुन पाहतो.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझे गाव.या गावातही श्री खंडोबाचे पुरातन मंदिर आहे.या खंडोबाची फार मोठी आख्यायिका आहे.या खंडोबाचा मी पुजारी आहे.या मंदिरात श्रावण महिन्यात धार्मिक ग्रंथाचे वाचन केले जाते.१९८५ ते १९९० पर्यंत मी स्वत: ग्रंथ वाचत असत आणि माझे आजोबा कै.दत्तात्रय ढेपे हे अर्थ सांगत असत.आजोबामुळेच मला धार्मिक ज्ञानाची गोडी लागली होती.त्यावेळी श्री मार्तंड भैरव हा ग्रंथ मी वाचला आहे.खंडोबाची किती तरी पुस्तकेही वाचली आहेत.मात्र जय मल्हार मालिकेमुळे श्री खंडोबाची आख्यायिका आणि त्यांचे जे कार्य आहे,याची अधिक माहिती झाली.माझ्या ज्ञानात भर पडली आहे.
अणदूरचा श्री खंडोबा अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावने दोन महिने असतो.मंदिरे दोन असली तरी देव मात्र एकच आहे.दोन्ही ठिकाणचे पुजारी एकच आणि ट्रस्टही एकच आहे. या ट्रस्टचा मी गेल्या पाच वर्षापासून सचिव आहे.
अणदूरच्या श्री खंडोबाची यात्रा २३ नोव्हेंबर रोजी पार पडली.शनिवार दि.२२ नोव्हेंबर रोजी माझ्या पुजेचा दिवस होता आणि २३ नोव्हेंबर रोजी मैलारपूर येथे पुजेचा दिवस होता.येणा-या भाविकांना भंडारा लावताता,मनात एक वेळगाच आनंद होता.येणा-या भाविकांना खंडोबाची माहिती सांगताना,प्रत्येकजण जय मल्हार मालिका पाहतो,हे आवर्जुन सांगत होता.लहान-लहान मुले देखील म्हाळसा कुठे आहे,बानू कुठे आहे,हेगडी प्रधान कुठे आहे,हे विचारत होते.हे ऐकूण मीही आनंदीत होत होतो.
ज्या खंडोबाच्या दर्शनासाठी भाविक लोक पुणे,मुंबई,औरंगाबाद,कर्नाटकसह अणदूर आणि मैलारपूरला येतात,रांगेत तास्नतास उभे राहून दर्शन घेतात,त्या खंडोबा मी पुजारी आहे,त्याच्या शेजारी बसण्याचे,त्याची पुजा करण्याचे भाग्य मला लाभते,हे माझे नशिबच आहे.मला याचा मनापासून आनंद आहे.भक्तांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभते,याचा अधिक आनंद आहे.
असो,जय मल्हार मालिकेमुळे श्री खंडोबा लोकांना अधिक भावला आहे.आता श्री खंडोबा भाविकांना अधिक पावो,त्यांची सर्व इच्छा आणि स्वप्ने साकार करो,ही श्री खंडोबा चरणी प्रार्थना.जय मल्हार मालिका काढणारे महेश कोठारे आणि झी मराठीचे आभार.कारण त्यांच्यामुळे श्री खंडोबाची आख्यायिका,त्यांचे कार्य लोकांना समजले.
श्री खंडोबा म्हणजे महादेव.महादेव म्हणजे खंडोबा आणि खंडोबा म्हणजेच महादेव.त्यांची पत्नी म्हाळसा ही आदिशक्ती पार्वतीचा अवतार.बानू ही त्यांची दुसरी पत्नी.बानू ही धनगर समजाची.त्यांचे प्रधान हेगडी हे विष्णुचा अवतार.साक्षार लक्ष्मी,ब्रम्हदेव आणि गणेश आणि नारद खंडोबाच्या दरबारात हजेरी लावत असत.
मणि आणि मल्ल या राक्षसाचा वध करण्यासाठी महादेवांनी श्री खंडोबाचा अवतार घेतला.गुरूवार दि.२७ नोव्हेंबर रोजी चंपाषष्टी होती.याच दिवशी खंडोबाने मणि आणि मल्ल राक्षसाचा वध केला होता.अशुभावर मिळालेला हा शुभ दिवस आहे.या दिवशी दर्शन घेणे हे एक पुण्य असते.या दिवशी दर्शन घेण्यासाठी मी पुन्हा मैलारपूरला गेलो होतो.शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी दर्शन झालेच होते.पण काल भाविक म्हणून दर्शनासाठी गेलो होतो.मन प्रसन्न झाले.
आता दर रविवारी मैलारपूर दौरा आहे.यात्रेच्या तीन दिवस मुक्काम आहे.यात्रा ४,५ आणि ६ जानेवारी २०१५ रोजी आहे.आपण नक्की या.आपले स्वागत आहे.मैलारपूरला किंवा अणदूरला दर्शनासाठी आला आणि काही अडचण भासली तर नक्की फोन करा.आपल्या सेवेस मी आणि आमचे पुजारी मंडळ तयार आहे.
पुनश्च आभार.
येळकोट,येळकोट जय मल्हार...सदानंदाचा येळकोट येळकोट...

आपला नम्र,
सुनील ढेपे


मागे वळून पाहताना...

बघता - बघता आज आयुष्याचे ४३ वर्षे पुर्ण केले.अजून हाफ सेंच्युरी सुध्दा मारली नाही.पण मला अकाली प्रौढत्व आले आहे.आयुष्यात जेवढे मोठे यश मिळाले,तेवढीच मोठी संकटे,दु:ख आणि वेदना सहन कराव्या लागल्या,पण यशाने कधी हूरळून गेलो नाही की दु:ख आणि संकट आले म्हणून कधी खचलो नाही.आयुष्यात तत्वाशी कधी तडजोड केली नाही,मी तत्वाशी ठाम राहिलो म्हणून काही वेळा संकटे आणि दु:ख सहन करावे लागले,हे आता कळून चुकले आहे पण हरलो नाही याचे समाधान वाटले.सत्य परेशान हो सकता है,लेकिन पराजित नही,हेच खरे.
आयुष्यात अनेक संकटे पाहिली पण १ मार्च २०१२ रोजी आलेले संकट कधीच विसरू शकत नाही.त्या संकटाने पार उद्ध्वस्त, हबकून आणि हरवून गेलो होतो.पण परमेश्वर कोणाची जागा कोणासाठी तरी तयार करून ठेवतो,हेच खरे.मुलांची देवकी जरी हरपली असली तरी यशोदा त्यांना मिळाली आहे.या यशोदाने आयुष्याला नविन फुंकर घालून दिली आहे.त्यामुळे पुन्हा जगायला शिकलो आहे.कितीही संकटे आली तरी हरायचे नाही किंवा रडायचे नाही,लढायचे हे शिकलो आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझे गाव.मला वयाच्या चौथ्या वर्षी शाळेत घालण्यात आले.त्यावेळी बालवाडी नव्हती.पहिलीत प्रवेश देताना मास्तरांनी अंदाजे जन्मतारीख लिहिली आणि तीच माझी जन्मतारीख झाली.माझी जन्मतारीख लिखित स्वरूपात कुठे अजून तरी सापडली नाही.कारण माझे आई - वडील अशिक्षित होते.आई - वडील अशिक्षित होते पण त्यांचे संस्कारच मला कधी तत्वाशी तडजोड करू देत नाहीत.
वयाच्या १७ व्या वर्षी पत्रकारितेत आलो.२१ व्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकलो होतो.२२ व्या वर्षी बाप झालो,त्यामुळेच अकाली प्रौढत्व आले आहे.गरीबी परिस्थितीवर मात करीत एम.ए.बी.जे.शिक्षण पुर्ण केले.लोकमत,एकमत,लोकसत्तानंतर आता भास्करसारख्या नामांकित दैनिकात काम करण्याची संधी मिळाली आहे.न्यूज एक्स्प्रेसच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक मीडियातही काम करण्याची संधी मिळाली.गेल्या चार वर्षापासून उस्मानाबाद लाइव्ह (www.osmanabadlive.com ) हे न्यूज पोर्टल सुरू आहे.
आजपर्यंत पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य पातळीवरील २५ आणि विभागीय पातळीवरील १० असे ३५ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.गेल्या चार- पाच वर्षापासून मी कुठे पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवत नाही किंवा कोणी पुरस्कार देतो म्हटले तरी नम्रपणे नाकारतो.कारण पत्रकारितेत आलेल्या नव्या तरूणांना संधी मिळावी हा त्यामागील उद्देश आहे.
मी पत्रकारितेत कसा आलो,आजपर्यंत कोणकोणती प्रकरणे गाजवली हे माझ्या या http://muktrang.blogspot.in ब्लॉगवर सविस्तर वाचू शकता.अणदूरचे फुलचंद घुगे प्रकरण,चिवरीची पशुहत्त्या,सास्तूरचे नरबळी प्रकरण,जवळा खुर्द नरबळी प्रकरण,१९९३ ला झालेल्या प्रलयकारी भूकंपाचे १ महिना ऑल द स्पॉट केलेले वार्तांकन,वन विभागातील चंदन चोरी प्रकरण आदी किती तरी प्रकरणे गाजवली.
ज्यावेळी मी पत्रकारितेस सुरूवात केली त्यावेळी फॅक्स यंत्र सुध्दा नव्हते.हाताने बातम्या लिहून टपालाने पाठवाव्या लागत होत्या.नंतर फॅक्स,नंतर ई- मेल आणि आता तर डायरेक्ट पेज लावून पाठवण्याची संकल्पना आली.ई - मेल,फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅप्सच्या जमान्यात पत्रकारिता आता सोपी झाली पण पत्रकार थोडे आळशी झाले,ही खंत कधी कधी लागून राहते.ऐकीव माहितीवर ब्रेकिंग न्यूज चालवली जाते,याचा खेदही वाटतो.पण असो...
आजच्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी - ज्यांनी शुभेच्छा दिल्या,त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार.असेच प्रेम,स्नेह आणि सदिच्छा कायम राहोत,ही अपेक्षा.

आपला
सुनील ढेपे
9420477111

उस्मानाबाद लाइव्हनंतर आता उस्मानाबाद टुडे

काळ खूप बदलला आहे.काळाबरोबर प्रिंट,इलेक्ट्रॉनिक्स आणि वेब मीडियात अनेक क्रांतीकारी बदल झाले आहेत.वाचकांना झटपट बातम्या हव्या आहेत. आजची बातमी आज नव्हे आताच हवी आहे.त्यामुळेच साडेतीन वर्षापुर्वी 'उस्मानाबाद लाइव्ह' हे न्यूज पोर्टल सुरू केले.आता आम्ही आणखी एक क्रांतीकारी पाऊल टाकत आहोत.
तमाम उस्मानाबादकरांच्या सेवेसाठी आम्ही १ मे पासून 'उस्मानाबाद टुडे' हे मोबाईल अ‍ॅप्स सुरू करीत आहोत.त्यामुळे वाचकांना आपल्या स्मार्ट फोनवर जलदगतीने उस्मानाबादच्या बातम्या वाचता येतील.'उस्मानाबाद लाइव्ह' हे न्यूज पोर्टल तर सुरू राहीलच,शिवाय जोडीला 'उस्मानाबाद टुडे' हे मोबाईल अ‍ॅप्स आपल्या काही नव्या अपेक्षा पुर्ण करेल.या अ‍ॅप्सवर उस्मानाबाद लाइव्हपेक्षा वेगळ्या काही बातम्या राहतील.आता कोणतीही बातमी घडली की ती पहिल्यांदा उस्मानाबाद टुडे अ‍ॅप्सवर अपडेट होतील.
तेव्हा माझ्या समस्त उस्मानाबादकरांनो....या सेवेचा लाभ घ्या.हे अ‍ॅप्स आपलेच आहे आणि या अ‍ॅप्सवर आपल्याच बातम्या आहेत....

कसा अपलोड कराल उस्मानाबाद टुडे अ‍ॅप्स ?

आपल्या स्मार्ट फोनवरील गुगल Play Store मध्ये जा. तिथे Osmanabad Today सर्च करा. नंतर हा अ‍ॅप्स डाऊनलोड करा.नंतर या अ‍ॅप्सवर जा.तिथे आम्ही दिलेला फॉर्म भरा आणि तो आमच्याकडे Send करा. नंतर आपल्या ई - मेल आय.डी.वर आमचा ई - मेल येईल.नंतर या सेवेचा लाभ घ्या.

... हे दृष्टचक्र थांबल्याशिवाय उस्मानाबादचा विकास अशक्य - सुनील ढेपे

पुणे - सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता हे दृष्टचक्र थांबविण्यासाठी मतदारांनी आता जागृत होण्याची गरज आहे,जो पर्यंत मतदार जागृत होणार नाहीत,तोपर्यंत उस्मानाबादचा ख-या अर्थाने विकास होणार नाही,असे परखड मत 'उस्मानाबाद लाइव्ह'चे संपादक सुनील ढेपे यांनी येथे मांडले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये दि.२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पुणे आणि मुंबईत राहणा-या उस्मानाबादकरांचा 'उस्मानाबाद मिलाप - २०१३' हा स्नेहमेळावा पार पडला.या स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून सुनील ढेपे बोलत होते.
उस्मानाबाद आणि लातूर जिल्हा पुर्वी एकत्र होता,मात्र १९८२ रोजी वेगळया झालेल्या लातूर जिल्ह्याचे उत्तुंग भरारी घेतली.विलासराव देशमुख यांच्यासारखे विकासाभिमुख नेतृत्व लातूर जिल्ह्याला लाभल्यामुळे लातूरची प्रगती झाली.उस्मानाबादच्या नेत्यांना विकासाऐवजी निवडणुक आली की,मतदारांना प्रलोभणे दाखवायची आणि निवडून यायचे ऐवढेच माहित आहे.त्यामुळे सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता हे दृष्टचक्र सुरू आहे.
उस्मानाबादचे अनेक प्रश्न राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीअभावी धूळखात पडले आहेत.तेरणा कारखाना,जिल्हा मध्यवर्ती बॅक,दुध संघावर आजपर्यंत कोणाची सत्ता होती,त्या पापाचे धनी कोण ? असा प्रश्नही ढेपे यांनी उपस्थित करून मतदारांनी आता जागृत होण्याची गरज प्रतिपादन केली.
आता पत्रकारांची मक्तेदारी राहिलेली नाही.प्रत्येकजण आता पत्रकार झालेला आहे. फेसबुक,ट्युटर,ब्लॉगच्या माध्यमातून प्रत्येकजण मतदारांची जनजागृती करू शकतो,असे सांगून येणा-या प्रत्येक निवडणुकीत सिटीजन्स जर्नालिझम मोठी करामत करेल,असेही श्री.ढेपे म्हणाले.
उस्मानाबाद लाइव्ह हे कोणत्याही एका राजकीय पक्षाचे मुखपत्र नाही.कोणत्याही एका नेत्यांचे तळी उचलणारे माध्यम नाही,जे सत्य असेल,तेच देवू,भले सत्य कितीही कडवट असेल तरी त्याची परवा करणार नाही,अशी ग्वाही श्री.ढेपे यांनी दिली.
उस्मानाबाद सोडून गेलेल्या लोकांना मी उस्मानाबादचा आहे,हे सांगायला लाज वाटते,मात्र दयानंद पाटील आणि त्यांच्या सहका-यांनी पुण्यात उस्मानाबाद मिलाप कार्यक्रम घेवून,एक आगळा - वेगळा इतिहास घडविला असून,या कार्यक्रमाचा समस्त उस्मानाबादकरांना अभिमान असल्याचेही गौरवोद्गार श्री.ढेपे यांनी यावेळी काढले.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक दयानंद पाटील,प्रदीप लोखंडे,गोरख भोरे,विक्रम साळवे यांचीही भाषणे झाली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप कदम,दत्तात्रय करंवदे व त्यांच्या सर्व सहका-यांनी परिश्रम घेतले.

उस्मानाबादेत डिसेंबर महिन्यात टेक्नो प्रदर्शन होणार आहे.या प्रदर्शनाच्या पत्रिकेचे प्रकाशन उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे,गोरख भोरे,दयानंद पाटील,प्रदीप लोखंडे,प्रदीप पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. - See more at: http://www.osmanabadlive.com/Mainnews-222-...%20%E0%A4%B9%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%20%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%20%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%20%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%87-.html#sthash.YGzTAqlq.dpuf

पुणे - सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता हे दृष्टचक्र थांबविण्यासाठी मतदारांनी आता जागृत होण्याची गरज आहे,जो पर्यंत मतदार जागृत होणार नाहीत,तोपर्यंत उस्मानाबादचा ख-या अर्थाने विकास होणार नाही,असे परखड मत 'उस्मानाबाद लाइव्ह'चे संपादक सुनील ढेपे यांनी येथे मांडले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये दि.२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी  पुणे आणि मुंबईत राहणा-या उस्मानाबादकरांचा  'उस्मानाबाद मिलाप - २०१३' हा स्नेहमेळावा पार पडला.या स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून सुनील ढेपे बोलत होते.

उस्मानाबाद आणि लातूर जिल्हा पुर्वी एकत्र होता,मात्र १९८२ रोजी वेगळया झालेल्या लातूर जिल्ह्याचे उत्तुंग भरारी घेतली.विलासराव देशमुख यांच्यासारखे विकासाभिमुख नेतृत्व लातूर जिल्ह्याला लाभल्यामुळे लातूरची प्रगती झाली.उस्मानाबादच्या नेत्यांना विकासाऐवजी निवडणुक आली की,मतदारांना प्रलोभणे दाखवायची आणि निवडून यायचे ऐवढेच माहित आहे.त्यामुळे सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता हे दृष्टचक्र सुरू आहे.
उस्मानाबादचे अनेक प्रश्न राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीअभावी धूळखात पडले आहेत.तेरणा कारखाना,जिल्हा मध्यवर्ती बॅक,दुध संघावर आजपर्यंत कोणाची सत्ता होती,त्या पापाचे धनी कोण ? असा प्रश्नही ढेपे यांनी उपस्थित करून मतदारांनी आता जागृत होण्याची गरज प्रतिपादन केली.
आता पत्रकारांची मक्तेदारी राहिलेली नाही.प्रत्येकजण आता पत्रकार झालेला आहे. फेसबुक,ट्युटर,ब्लॉगच्या माध्यमातून प्रत्येकजण मतदारांची जनजागृती करू शकतो,असे सांगून येणा-या प्रत्येक निवडणुकीत सिटीजन्स जर्नालिझम मोठी करामत करेल,असेही श्री.ढेपे म्हणाले.
उस्मानाबाद लाइव्ह हे कोणत्याही एका राजकीय पक्षाचे मुखपत्र नाही.कोणत्याही एका नेत्यांचे तळी उचलणारे माध्यम नाही,जे सत्य असेल,तेच देवू,भले सत्य कितीही कडवट असेल तरी त्याची परवा करणार नाही,अशी ग्वाही श्री.ढेपे यांनी दिली.

उस्मानाबाद सोडून गेलेल्या लोकांना मी उस्मानाबादचा आहे,हे सांगायला लाज वाटते,मात्र दयानंद पाटील आणि त्यांच्या सहका-यांनी पुण्यात उस्मानाबाद मिलाप कार्यक्रम घेवून,एक आगळा - वेगळा इतिहास घडविला असून,या कार्यक्रमाचा समस्त उस्मानाबादकरांना अभिमान असल्याचेही गौरवोद्गार श्री.ढेपे यांनी यावेळी काढले.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक दयानंद पाटील,प्रदीप लोखंडे,गोरख भोरे,विक्रम साळवे यांचीही भाषणे झाली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप कदम,दत्तात्रय करंवदे व त्यांच्या सर्व सहका-यांनी परिश्रम घेतले.

उस्मानाबादेत डिसेंबर महिन्यात टेक्नो प्रदर्शन होणार आहे.या प्रदर्शनाच्या पत्रिकेचे प्रकाशन उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे,गोरख भोरे,दयानंद पाटील,प्रदीप लोखंडे,प्रदीप पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.



मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारिणीवर सुनील ढेपे

मुंबई - मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारिणीवर सदस्य म्हणून उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या निवडीची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक यांनी केली आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पिंपरी चिंचवड येथे पार पडली.यावेळी परिषदेच्या उपाध्यक्षपदी पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार सुभाष भारव्दाज,कोषाध्यक्षपदी अकोल्याचे पत्रकार सिध्दार्थ शर्मा तर कार्यकारिणी सदस्य म्हणून उस्मानाबादचे उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम,देशमुख,परिषदेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे,सरचिटणीस संतोष पवार आणि विविध जिल्हयातील पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषद ही देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असून ३५ जिल्हयात शाखा आणि सात हजारावर पत्रकार सदस्य असलेली ही संस्था पुढाल वर्षी ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.राज्यातील अनेक ज्येष्ठ आणि मान्यवर पत्रकारांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे.
नुकतेच औरंगाबादेत मराठी पत्रकार परिषदेचे ३९ वे राज्यस्तरीय अधिवेशन मोठ्या थाटामाटात पार पडले होते.या अधिवेशास उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांना 'ग्रामीण पत्रकारांची समस्या' या चर्चासत्रात सहभागी करून घेण्यात आले होते.
dainik Lokbhabodhan

dainik surajya.solapur

dainik Lokmat

dainik sakal

dainik janmat.osmanabad

ग्रामीण पत्रकारांना दबाबाखाली काम करावे लागते - ढेपे

औरंगाबाद - ग्रामीण भागातील पत्रकारांना अत्यंत दहशतीखाली आणि दबाबाखाली काम करावे लागत असून,विरोधात आणि प्रवाहाविरूध्द बातम्या दिल्या की,त्यांना मार खावा लागतो,त्यासाठी पत्रकार संरक्षण कायंद्याची गरज असल्याचे मत उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांनी येथे व्यक्त केले.
मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय ३९ वे राज्यस्तरीय अधिवेशन संत तुकाराम नाट्यगृहात पार पडले.या अधिवेशनास राज्यभरातून किमान १८०० पत्रकार उपस्थित होते.या अधिवेशनात पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात ग्रामीण पत्रकारांच्या समस्या आणि उपाय यावर चर्चासत्र पार पडले.यावेळी सुनील ढेपे बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सुधीर गव्हाणे होते तर चर्चासत्रात लोकमतचे कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे,सकाळचे कार्यकारी संपादक संजय वरकड,दिव्य मराठीचे निवासी संपादक धनंजय लांबे,भास्करचे निवासी संपादक अब्दुल कदीर,ज्येष्ठ पत्रकार डॉ.अनिल फळे,दिलीप धारूरकर,नागनाथ फटाले आदी सहभागी झाले होते.

वृत्तपत्राचे तंत्र जसे बदलले आहे,तसा मंत्रही बदलले आहे.मालकच संपादक झाल्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना अत्यंत अपु-या सुविधावर आणि तोकड्या मानधनावर काम करावे लागते.संपादकांना वाताणुकीत केबिनमध्ये बसून,पंतप्रधानाच्या विरोधात बातमी देणे सोपे आहे,मात्र ग्रामीण भागातील पत्रकारांना संरपचांच्या विरोधात बातम्या देणे अवघड आहे.विरोधात बातम्या दिल्यानंतर काय परिणाम भोगावे लागतात,याचे उदाहरणेही ढेपे यांनी यावेळी दिली.

घडी बिघडली की पिढी बिघडते ...

तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझं  मुळ गाव...येथील असंख्य लोकांचे कुलदैवत श्री खंडोबाचे आम्ही पुजारी...माझे अजोबा दत्तात्रय ढेपे यांना वडिलोपार्जित ८० एकर शेतजमिन...त्यांना सुर्यकांत, मधुकर, विश्वनाथ, अनिल अशी चार मुले...पैकी सुर्यकांत थोडेबहुत शिकले, विश्वनाथ हे डी.एड.काढून शिक्षक झाले, माझे वडील मधुकर व चुलते अनिल हे काहीच शिकले नाहीत.
शिक्षक विश्वनाथ यांना नितीन, सचिन व सुनिता अशी दोन मुले व एक मुलगी...पैकी सचिन व सुनिता हे शिक्षक झाले तर नितीन हे एम.बी.बी.एस. व पुढे एम.डी.करून डॉक्टर झाले..त्यांचे  सोलापूर व पुणे येथे मोठे हॉस्पीटल आहे...त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठी ख्याती प्राप्त केली आहे. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्वचा रोग व सौंदर्य तज्ज्ञ आहेत...ते ब-याच वेळा अनेक देशांचा परदेश दौरा करून आले..आणि देशातील विविध भागात जात असतात...
सांगायचा मुद्दा म्हणजे माझे चुलते किमान डी.एड.करून शिक्षक झाले व त्यांची तिन्ही मुले कर्तबगार निघाली...
या उलट माझे...माझे आई - वडील दोघेही अशिक्षित...कुटुंब वेगळे झाल्यानंतर माझ्या वडिलांच्या डोक्यावर मोठे कर्ज झाले...शेती पडिक पडल्यामुळे माझे आई - वडील मोल - मजुरी करू लागले..मी पाचवीत असताना गावात मुद्दाण्णा शेट्टी नावाचे गृहस्थ आले, त्यांनी अणदूरला छोटेसे उडप्पाचे हॉटेल सुरू केले...माझे वडील या हॉटेलात आचारी म्हणून काम करू लागले...त्यावेळी त्यांना दररोज एक रूपया पगार होता..
मी कशी - बशी दहावी काढली...शाळेत जाण्यासाठी वर्षभर एक अथवा दोन ड्रेस, वह्या - पुस्तकांचा वाणवा...घरातील दारिद्रय वातावरण यामुळे मला त्यावेळी केवळ दहावीला ५६ टक्के मार्क पडले..त्यावेळी डी.एड.५७ टक्काला क्लोज झाल्यामुळे माझी शिक्षक होण्याचे स्वप्न भंग पावले...माझी चित्रकला चांगली होती, पण पैश्याअभावी ए.टी.डी.लाही जावू शकलो नाही.नाईलाजास्तव नळदुर्गच्या बालाघाट महाविद्याल्यात ११ आर्टला प्रवेश घेतला...अकरावी करीत असताना आई - वडिलांना हातभार लावण्यासाठी मी अणदूरला न्यूज पेपरच्या एजन्स्या घेतल्या...पुढे वृत्तपत्रात वाचकांच्या पत्रव्यवहारातून माझ्या पत्रकारितेचा जन्म झाला...पुढे पत्रकार झालो...सध्या  प्रथितयश पत्रकार म्हणून नावलौकिक आहे...पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट लिखाणाबद्दल २६ पुरस्कार मी मिळविले..पण पैसा काहीच कमवला नाही..मला अनेकजण टोमणे मारतात..तो पहा..परवा आलेल्या पत्रकारांने चार चाकी वाहन  घेतले..बंगला घेतला...मी माझ्या एकमतच्या दहा वर्षाच्या काळात खूप पैसा कमवू शकलो असतो, पण मी कधीही पैश्याकडे लक्ष दिले नाही...पैश्याने माणूस श्रीमंत होतो, मोठा होत नाही, हे माझे  मत आहे..
असो सांगायचा उद्देश असा की, मी थोडेफार शिकूण मोठा झाल्यामुळे माझी मुले आता चांगले शिक्षण घेत आहेत..माझी मुलगी कु. मयुरी हिला दहावीला ९३ टक्के होते तर बारवीत ८९.८३ टक्के पडले आहेत..तिच्या बारावी परिक्षेच्या काळातच तिच्या आईचे कॅन्सरचे ऑपरेशन झाल्यामुळे सी.ई.टी.ला म्हणावे तसे मार्क पडले नाहीत..पण काळजी करण्याचे कारण नाही....तिचा हव्या त्या कॉलेजला हव्या ब्रॅन्चला नंबर लागलेला आहे..माझ्या ढेपे घराण्यात ती पहिली इंजिनिअर होणार आहे..
मयुरी मला नेहमी म्हणते की, पप्पा मी कलेक्टर होणार आहे, हा फक्त बेसिक कोर्स करणार आहे.... ती कलेक्टर होईल अथवा न होईल पण तिची जिद्द व चिकाटी महत्वाची आहे...मुले गुणवंत आणि कर्तबगार निघाल्यानंतर प्रत्येक पालकांचा ऊर भरून येतो, तसेच काहीसे  माझ्या बाबतीत झाले आहे...
काही दिवसापुर्वी श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये कु.मयुरीचा बारावी परिक्षेत चांगले मार्क घेतल्याबद्दल सत्कार झाला होता..त्यावेळी पालक म्हणून सुधीर आण्णा पाटील यांनी मला बोलण्याची संधी दिली...मी कु.मयुरीच्या यशाचे श्रेय तिच्या आईला दिले..कारण कु.मयुरीला घडविण्यात तिच्या आईचा वाटा आहे...इतके दिवस  मयुरीला शाळेतील सर्वजण शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी  हे पत्रकार सुनील ढेपे यांची मुलगी का म्हणून विचारत होते, मी त्यावर भाषणात म्हटले, कु.मयुरीने असे कर्तत्व करून दाखविले पाहिजे....कु. मयुरी ढेपे ही तुमची मुलगी आहे का, असे विचारले पाहिजे...या वाक्यावर सर्वांनीच टाळ्या वाजविल्या होत्या....या टाळ्या माझ्या नेहमीच आठवणीत राहतील...
मी जर अणदूरमध्येच श्री खंडोबाचा पुजारी म्हणून किंवा वडिलोपार्जित शेती किंवा व्यवसाय करीत बसलो असतो तर माझी पुढची पिढी सुधारली नसती..खरंच घडी बिघडली की पिढी बिघडते आणि सुधारली तर पुढची पिढी सुधारते....माझी आई दहा वर्षापुर्वी काविळीच्या आजाराने निधन पावली, वडील पाच वर्षापुर्वी अपघातात देवाघरी गेले, आज कु.मयुरीच्या आनंदात ते सहभागी होण्यासाठी ह्यात नाहीत, पण त्यांची आठवण आमच्या स्मरणात नेहमीच आहे...

- सुनील ढेपे