खेमका नावाच्या खमक्या अधिकारी सोबत ...हरियाणा सरकार मध्ये अशोक खेमका नावाचे कडक शिस्तीचे सनदी अधिकारी आहेत, ते सध्या प्रधान सचिव आहेत.

महाराष्ट्रात तुकाराम मुंडे जसे आहेत, त्यापेक्षा किती तरी पटीने कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानी अनेक प्रकरणात कारवाई केली आहे, त्यामुळे त्यांची 28 वर्षात 56 वेळा बदली झाली आहे.

खेमका यांच्या हस्ते आमचे खास मित्र बाळासाहेब सुभेदार यांना पुण्यातील सजग नागरिक मंचच्या वतीने सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला, कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांच्या सोबत बाळासाहेब , मी आणि मंचचे मोजके अधिकारी यांनी स्नेहभोजन घेतले, दोन तासाच्या सहवासात अनेक विषयावर चर्चा झाली!


प्रधान सचिव असूनही त्यांच्यातील साधेपणा मला भावला !

- सुनील ढेपे, संपादक, उस्मानाबाद लाईव्ह


#Ashok_Khemka