सुनील ढेपे यांना मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार प्रदान
उस्मानाबाद - मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि
उस्मानाबाद लाइव्हचे मुख्य संपादक सुनील ढेपे यांना मराठी पत्रकार परिषदेचा
राज्यस्तरीय कै.नागोजीराव दुधगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार ठाणे येथील
एका भव्य आणि दिव्य कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या
हस्ते सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी मराठवाड्यातील एका पत्रकारास राज्यस्तरीय कै.नागोजीराव दुधगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो.यंदाच्या पुरस्कारासाठी उस्मानाबाद लाइव्हचे मुख्य संपादक सुनील ढेपे यांना घोषित करण्यात आला होता.हा पुरस्कार ठाणे येथील गडकरी रंगायतन सभागृहात दर्पण दिनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकसत्ताचे माजी संपादक अरूण टिकेकर,ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते.