मुंबई - मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारिणीवर सदस्य म्हणून
उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांची सर्वानुमते निवड करण्यात
आली.या निवडीची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक यांनी केली
आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पिंपरी चिंचवड येथे
पार पडली.यावेळी परिषदेच्या उपाध्यक्षपदी पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार सुभाष
भारव्दाज,कोषाध्यक्षपदी अकोल्याचे पत्रकार सिध्दार्थ शर्मा तर कार्यकारिणी
सदस्य म्हणून उस्मानाबादचे उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांची
निवड करण्यात आली.
या बैठकीस परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक, पत्रकार हल्ला विरोधी कृती
समितीचे निमंत्रक एस.एम,देशमुख,परिषदेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर
बेहेरे,सरचिटणीस संतोष पवार आणि विविध जिल्हयातील पत्रकार प्रतिनिधी
उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषद ही देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असून ३५
जिल्हयात शाखा आणि सात हजारावर पत्रकार सदस्य असलेली ही संस्था पुढाल वर्षी
७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.राज्यातील अनेक ज्येष्ठ आणि मान्यवर
पत्रकारांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे.
नुकतेच औरंगाबादेत मराठी पत्रकार परिषदेचे ३९ वे राज्यस्तरीय अधिवेशन
मोठ्या थाटामाटात पार पडले होते.या अधिवेशास उस्मानाबाद लाइव्हचे संपादक
सुनील ढेपे यांना 'ग्रामीण पत्रकारांची समस्या' या चर्चासत्रात सहभागी करून
घेण्यात आले होते.
 |
dainik Lokbhabodhan |
 |
dainik surajya.solapur |
 |
dainik Lokmat |
 |
dainik sakal |
 |
dainik janmat.osmanabad |