ग्रामीण पत्रकारांना दबाबाखाली काम करावे लागते - ढेपे

औरंगाबाद - ग्रामीण भागातील पत्रकारांना अत्यंत दहशतीखाली आणि दबाबाखाली काम करावे लागत असून,विरोधात आणि प्रवाहाविरूध्द बातम्या दिल्या की,त्यांना मार खावा लागतो,त्यासाठी पत्रकार संरक्षण कायंद्याची गरज असल्याचे मत उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांनी येथे व्यक्त केले.
मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय ३९ वे राज्यस्तरीय अधिवेशन संत तुकाराम नाट्यगृहात पार पडले.या अधिवेशनास राज्यभरातून किमान १८०० पत्रकार उपस्थित होते.या अधिवेशनात पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात ग्रामीण पत्रकारांच्या समस्या आणि उपाय यावर चर्चासत्र पार पडले.यावेळी सुनील ढेपे बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सुधीर गव्हाणे होते तर चर्चासत्रात लोकमतचे कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे,सकाळचे कार्यकारी संपादक संजय वरकड,दिव्य मराठीचे निवासी संपादक धनंजय लांबे,भास्करचे निवासी संपादक अब्दुल कदीर,ज्येष्ठ पत्रकार डॉ.अनिल फळे,दिलीप धारूरकर,नागनाथ फटाले आदी सहभागी झाले होते.

वृत्तपत्राचे तंत्र जसे बदलले आहे,तसा मंत्रही बदलले आहे.मालकच संपादक झाल्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना अत्यंत अपु-या सुविधावर आणि तोकड्या मानधनावर काम करावे लागते.संपादकांना वाताणुकीत केबिनमध्ये बसून,पंतप्रधानाच्या विरोधात बातमी देणे सोपे आहे,मात्र ग्रामीण भागातील पत्रकारांना संरपचांच्या विरोधात बातम्या देणे अवघड आहे.विरोधात बातम्या दिल्यानंतर काय परिणाम भोगावे लागतात,याचे उदाहरणेही ढेपे यांनी यावेळी दिली.