पत्रकार सुनील ढेपे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप

पुणे - महाराष्ट्र लाइव्हचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्याजवळील वडकी येथील परशुराम जगताप केंद्रीय अनु.जाती प्राथमिक आणि माध्यमिक निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले, तसेच फळफळावळ आणि बिस्किटे वाटप करण्यात आले,त्यानंतर त्यांना स्नेहभोजन देण्यात आले.
सुनील ढेपे युवा मंचचे अध्यक्ष व पत्रकार चंद्रशेखर भांगे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते, कार्यक्रमास शाळेचे संस्थापक मोरे, मुख्याध्यापक मोराळे, तसेच अंबादास गोरे आदी उपस्थित होते.
प्रारंभी सुनील ढेपे यांच्या हस्ते केक कापण्यात आला, तत्पूर्वी पाच विद्यार्थीनी त्यांना औक्षण केले. यावेळी पत्रकार सुनील ढेपे यांनी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश कसे मिळवता येते हे स्वतःच्या अनुभवावरून सांगितले.
दहावी - बारावी परीक्षेत चांगले मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
गेल्या 17 वर्षांपासून विना अनुदानित असलेल्या वडकी येथील निवासी आश्रम शाळेत जवळपास दीडशे गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यानी पुढे यावे, असे आवाहन चंद्रशेखर भांगे यांनी केले आहे.