येळकोट,येळकोट जय मल्हार...
झी मराठीवरील 'जय मल्हार' ही मालिका खूप लोकप्रिय झाली आहे.आज घराघरात सायंकाळचे सात वाजले की लोक टी.व्ही.समोर बसून 'जय मल्हार' मालिका आवडीने आणि भक्तीभावाने पहात आहेत.ही मालिका मी पण दररोज आवर्जुन पहात असतो.कधी चुकून कामाच्या व्यापामुळे वेळ निघून गेली तर रात्री साडेदहा वाजता ही मालिकेचा भाग दाखविला जातो,तेव्हा आवर्जुन पाहतो.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझे गाव.या गावातही श्री खंडोबाचे पुरातन मंदिर आहे.या खंडोबाची फार मोठी आख्यायिका आहे.या खंडोबाचा मी पुजारी आहे.या मंदिरात श्रावण महिन्यात धार्मिक ग्रंथाचे वाचन केले जाते.१९८५ ते १९९० पर्यंत मी स्वत: ग्रंथ वाचत असत आणि माझे आजोबा कै.दत्तात्रय ढेपे हे अर्थ सांगत असत.आजोबामुळेच मला धार्मिक ज्ञानाची गोडी लागली होती.त्यावेळी श्री मार्तंड भैरव हा ग्रंथ मी वाचला आहे.खंडोबाची किती तरी पुस्तकेही वाचली आहेत.मात्र जय मल्हार मालिकेमुळे श्री खंडोबाची आख्यायिका आणि त्यांचे जे कार्य आहे,याची अधिक माहिती झाली.माझ्या ज्ञानात भर पडली आहे.
अणदूरचा श्री खंडोबा अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावने दोन महिने असतो.मंदिरे दोन असली तरी देव मात्र एकच आहे.दोन्ही ठिकाणचे पुजारी एकच आणि ट्रस्टही एकच आहे. या ट्रस्टचा मी गेल्या पाच वर्षापासून सचिव आहे.
अणदूरच्या श्री खंडोबाची यात्रा २३ नोव्हेंबर रोजी पार पडली.शनिवार दि.२२ नोव्हेंबर रोजी माझ्या पुजेचा दिवस होता आणि २३ नोव्हेंबर रोजी मैलारपूर येथे पुजेचा दिवस होता.येणा-या भाविकांना भंडारा लावताता,मनात एक वेळगाच आनंद होता.येणा-या भाविकांना खंडोबाची माहिती सांगताना,प्रत्येकजण जय मल्हार मालिका पाहतो,हे आवर्जुन सांगत होता.लहान-लहान मुले देखील म्हाळसा कुठे आहे,बानू कुठे आहे,हेगडी प्रधान कुठे आहे,हे विचारत होते.हे ऐकूण मीही आनंदीत होत होतो.
ज्या खंडोबाच्या दर्शनासाठी भाविक लोक पुणे,मुंबई,औरंगाबाद,कर्नाटकसह अणदूर आणि मैलारपूरला येतात,रांगेत तास्नतास उभे राहून दर्शन घेतात,त्या खंडोबा मी पुजारी आहे,त्याच्या शेजारी बसण्याचे,त्याची पुजा करण्याचे भाग्य मला लाभते,हे माझे नशिबच आहे.मला याचा मनापासून आनंद आहे.भक्तांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभते,याचा अधिक आनंद आहे.
असो,जय मल्हार मालिकेमुळे श्री खंडोबा लोकांना अधिक भावला आहे.आता श्री खंडोबा भाविकांना अधिक पावो,त्यांची सर्व इच्छा आणि स्वप्ने साकार करो,ही श्री खंडोबा चरणी प्रार्थना.जय मल्हार मालिका काढणारे महेश कोठारे आणि झी मराठीचे आभार.कारण त्यांच्यामुळे श्री खंडोबाची आख्यायिका,त्यांचे कार्य लोकांना समजले.
श्री खंडोबा म्हणजे महादेव.महादेव म्हणजे खंडोबा आणि खंडोबा म्हणजेच महादेव.त्यांची पत्नी म्हाळसा ही आदिशक्ती पार्वतीचा अवतार.बानू ही त्यांची दुसरी पत्नी.बानू ही धनगर समजाची.त्यांचे प्रधान हेगडी हे विष्णुचा अवतार.साक्षार लक्ष्मी,ब्रम्हदेव आणि गणेश आणि नारद खंडोबाच्या दरबारात हजेरी लावत असत.
मणि आणि मल्ल या राक्षसाचा वध करण्यासाठी महादेवांनी श्री खंडोबाचा अवतार घेतला.गुरूवार दि.२७ नोव्हेंबर रोजी चंपाषष्टी होती.याच दिवशी खंडोबाने मणि आणि मल्ल राक्षसाचा वध केला होता.अशुभावर मिळालेला हा शुभ दिवस आहे.या दिवशी दर्शन घेणे हे एक पुण्य असते.या दिवशी दर्शन घेण्यासाठी मी पुन्हा मैलारपूरला गेलो होतो.शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी दर्शन झालेच होते.पण काल भाविक म्हणून दर्शनासाठी गेलो होतो.मन प्रसन्न झाले.
आता दर रविवारी मैलारपूर दौरा आहे.यात्रेच्या तीन दिवस मुक्काम आहे.यात्रा ४,५ आणि ६ जानेवारी २०१५ रोजी आहे.आपण नक्की या.आपले स्वागत आहे.मैलारपूरला किंवा अणदूरला दर्शनासाठी आला आणि काही अडचण भासली तर नक्की फोन करा.आपल्या सेवेस मी आणि आमचे पुजारी मंडळ तयार आहे.
पुनश्च आभार.
येळकोट,येळकोट जय मल्हार...सदानंदाचा येळकोट येळकोट...
आपला नम्र,
सुनील ढेपे