माझे व्यसन इतरांपेक्षा वेगळे आहे...
मी गेल्या ३५ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. माझ्या पत्रकारितेची सुरुवात सन १९८८ ला केसरीपासून सुरु झाली. त्यानंतर एकमत , लोकसत्ता, गावकरी या वुत्तपत्रात जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर सन २०११ मध्ये मी स्वतःचे धाराशिव लाइव्ह हे डिजिटल चॅनल सुरु केले.
धाराशिव लाइव्ह हा माझा एक स्वप्नवत उपक्रम आहे. वेबसाईट, युट्युब चॅनल, फेसबुक पेज यांच्या माध्यमातून धाराशिव लाइव्हवरील बातम्या किमान ५ लाख वाचकांपर्यंत पोहोचतात. धाराशिव लाइव्हचे वाचक केवळ धाराशिव जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, देश आणि विदेशातही आहेत. धाराशिव लाइव्हच्या युट्युब चॅनलला १ लाख सबस्क्राईब झाल्यामुळे सिल्व्हर बटन मिळाले आहे, जी माझ्या कामाची पावती आहे.माझ्या उत्कृष्ट लिखाणामुळे पत्रकारितेतील ४० हुन अधिक पुरस्कार मला मिळाले आहेत. हे पुरस्कार माझ्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे प्रतिक आहेत.
माझ्या वैयक्तिक जीवनात मी कोणतेही वाईट व्यसन करत नाही.मी इतर पत्रकारासारखे नॉनव्हेज खात नाही, बारमध्ये जाऊन दारू पित नाही आणि बारीवर जाऊन महिलांचे नृत्य पाहत नाही. या सर्व गोष्टींना मी नेहमी टाळले आहे.
डिजिटल मीडियात नेहमी वेगवेगळे प्रयोग करणे हा माझा छंद आहे. दररोज बातम्यांबरोबर इतर लेखन करतो,कविता , गाणी लिहितो. वेगवेगळे प्रयोग करतो, तरुणांना मार्गदर्शन करतो ... हेच माझे खरे व्यसन आहे. माझ्या कामामुळे मला खूप आनंद आणि समाधान मिळते.
माझ्या कामामुळे काही पत्रकारितेतील महाभागांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले आणि तेच आज बदनाम झाले आहेत. हे माझ्या प्रामाणिकपणाचे आणि सत्याचे विजयी झालेले एक उदाहरण आहे.
माझा हा ३५ वर्षांचा प्रवास खूपच शिकवणारा आणि प्रेरणादायी आहे. धाराशिव लाइव्हच्या माध्यमातून मी समाजाच्या सेवेचे कार्य करत आहे आणि हेच माझे जीवनध्येय आहे. पत्रकारितेतील माझी निष्ठा आणि प्रामाणिकपणा हेच माझ्या यशाचे खरे रहस्य आहे.
-सुनील ढेपे
( माझ्या आत्मचरित्रातील सारांश )