पत्रकारांनो, काळाबरोबर चला !

'उस्मानाबाद लाइव्ह' हे न्यूज वेब पोर्टल सन 2011 मध्ये सुरू झाले आणि तेव्हापासून मी डिजिटल मीडियात काम करीत आहे.
याच वर्षी सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात झालेल्या गेस्ट लेक्चरमध्ये मी येत्या सात ते आठ वर्षात वृत्तपत्राची जागा ईपेपर घेतील, असे भाकीत केले होते, हे भाकीत खरे ठरले आहे, प्रिंट पेक्षा जास्त वाचक ईपेपरचा आहे . भविष्यात प्रिंट बंद पडतील आणि फक्त ईपेपर सुरू राहतील, असा माझा अंदाज आहे.अमेरिकेत सध्या वृत्तपत्रे प्रिंटमध्ये निघत नाहीत,तेथे फक्त ईपेपर आहेत. ही परिस्थिती आपल्या देशात सन 2025 मध्ये तयार होईल, काही मोजके वृत्तपत्र सोडले तर सर्व वृत्तपत्र बंद पडतील, ईपेपर वाचकांना पैसे मोजून वाचावी लागतील !
आपल्या देशात कोणतेही तंत्रज्ञान येण्यास थोडा उशीर लागतो, तसे 4 जी चे झाले, 4 जी उशिरा आला पण तो आल्यामुळे कोणतेही वृत्तपत्रे स्मार्टफोनवर वाचण्यास सुलभ झाले, टेस्टची वेबसाईट वाचण्यास तर अधिक गती प्राप्त झाली, मोबाईलवर युट्युबवरील व्हिडीओ जलदगतीने पाहता येऊ लागले, त्यामुळे प्रत्येक तालुक्यात युट्युब चॅनल सुरू झाले,
फेसबुक, व्हाट्स अँप,ट्यूटर, टेलिग्राम आदी सोशल मीडिया फास्ट झाला, त्यामुळे डिजिटल मीडियामध्ये मोठी क्रांती झाली आहे.येत्या 3 वर्षात 5 जी सुरू होईल, त्यामुळे फक्त मोबाईलवर दिसणारे अनेक चॅनल सुरू होतील.
भविष्यात प्रिंट आणि न्यूज चॅनलचे भविष्य अवघड आहे, येणारा काळ हा फक्त डिजिटल मिडीयाचा राहणार आहे.
त्यामुळे तरुण पत्रकारांना डिजिटल मीडियाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने पुण्यात डिजिटल मीडियावर कार्यशाळा आयोजित करण्याचा मनात विचार आला, तो विचार माझे मित्र पंकज इंगोले यांच्यामुळे सफल झाला, पंकज हे झी 24 तास मध्ये अनेक वर्षे न्यूज अँकर होते, त्यापूर्वी ईटीव्ही, नंतर मी मराठी, महाराष्ट्र 1 मध्येही काम केले आहे, त्यानी पुण्यात टीव्ही मीडियात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकॅडमी सुरू केली आहे, याच अकॅडमीच्या एसी हॉलमध्ये रविवारी डिजिटल मीडिया विषयावर भव्य कार्यशाळा पार पडली, हॉलची क्षमता फक्त 50 असल्यामुळे फक्त मोजक्या लोकांना प्रवेश देण्यात आला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन अनेकजण आले होते.
त्यात सकाळचे डिजिटल संपादक सम्राट फडणीस, आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे, झी 24 तासचे डिजिटल संपादक प्रशांत जाधव यांनी मार्गदर्शन केले, मीही वेबसाईट, ईपेपर अपलोड कसा करावा, याचे ट्रेनिंग दिले,मुंबई सकाळच्या हर्षदा परब यांनी फेसबुक लाइव्हचा डेमो दाखविला !
ज्यांना प्रवेश मिळाला नाही किंवा जे येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा दिवाळी नंतर अशीच कार्यशाळा होईल, काही नवीन पाहुणे येतील..
तेव्हा काळाची गरज ओळखून डिजिटल मीडियाचे प्रशिक्षण घ्या !
डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पैसे मिळू शकतात, ते कसे मिळतात याचे सुद्धा मार्गदर्शन करण्यात येते, तेव्हा ही संधी घालवू नका !
सुनील ढेपे
संपादक, महाराष्ट्र लाइव्ह
7387994411

या पूर्वीचे लेख वाचा

डिजिटल मीडियाचे वारे ...

येत्या दशकात वेब मीडियाचा उदय - सुनील ढेपे