माझ्यावरील हल्ला,एस.एम आणि वस्तुस्थिती !
मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न असलेला उस्मानाबाद जिल्हा जिल्हा मराठी
पत्रकार संघ नोंदणीकृत नाही.तरीही या पत्रकार संघाने शासनाकडून एकदा नव्हे
दोनदा भूखंड लाटला आहे.राजेंद्र बहिरे अध्यक्ष असताना,पत्रकार भवनासाठी
वाढीव बांधकाम करायचे आहे,असे सांगून तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी
यांच्या कार्यकालात दोन लाख निधी मिळवला,त्यातून सांजा रोडवर अर्धा एकर
खासगी जमिन विकत घेण्यात आली, दीड लाखात घेतलेल्या या जमिनीची किंमत आज एक
कोटीच्या घरात आहे.
उस्मानाबादच्या आंबेडकर पुतळ्याजवळ डबल मजली पत्रकार भवन.खाली दोन दुकाने,आकाशवाणीजवळ मोठा भूखंड,सांजा रोडवर एक कोटीची जागा आणि बँकेत 10 ते 15 लाख रूपयाची ठेव जमा आहेे.मी 1991 ला उस्मानाबादेत आलो,दुसर्या वर्षी या पत्रकार संघाचा उपाध्यक्ष झालो,भारत गजेंद्रगडकर अध्यक्ष होते,कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार स्पर्धा मी सुरू केली,तसा ठराव आजही नोंद आहे.भारत गजेंद्रगडकर आणि आम्ही कोणतेही राजकारण न करता सर्वांना सोबत घेवून काम केले.नंतर राजेंद्र बहिरे,भाऊसाहेब भन्साळी अध्यक्ष झाले,गजेंद्रगडकर यांनी सक्रीय पत्रकारिता सोडली,मीही व्यावसायात गुंतलो.नंतर मोतीचंद बेदमुथा अध्यक्ष झाले आणि पत्रकार संघाला बाजारू स्वरूप प्राप्त झाले,बेदमुथा यांनी पत्रकार संघाचा कार्यक्रम आहे असे सांगून अनेक अधिकारी आणि लोकप्रतिनिधीकडून देणग्या घेतल्या,त्या घश्यात घालण्याचा प्रयत्न झाला.याचवेळी संतोष हंबीरे सचिव झाला.बेदमुथा आणि हंबीरे यांनी उस्मानाबादच्या न्यास नोंदणी कार्यालयात उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाची नोंदणी करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला.प्रस्ताव दाखल करताना,100 रूपयाच्या स्टँम्पपेपरवर जे शपथपत्र देण्यात आले होते,ते संशयास्पद होते,या शपथपत्रात म्हटले होते की,उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाकडे कसलीही स्थावर किंवा जंगम मालमत्ता नाही.
मी हे शपथपत्र मिळवून संतोष हंबीरे याच्यावर उस्मानाबादच्या न्यायालयात केस दाखल केली,हंबीरेवर न्यायालयाच्या आदेशावरून उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये 420 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला.नंतर हे प्रकरण चार वर्षे चालले.मी आणि भारत गजेंद्रगडकर वगळता एकानेही ठाम साक्ष दिली नाही,हंबीरे केस मागे घेण्यासाठी पाया पडत होता,पण त्याच्या बापाचा वाईट अनुभव लक्षात घेवून मी खरी साक्ष दिली.कोर्टाने त्याला काही कारणामुळे क्लीन चिट दिली.नंतर धनंजय रणदिवे आणि त्यानंंतर संतोष जाधव अध्यक्ष झाले.जाधवांच्या काळात सांजा रोडवरील अर्धा एकर जमिन कवडीमोल दराने विकण्याचा प्रयत्न झाला,त्याचे जाहीर प्रकटन स्थानिक दैनिक संघर्षमध्ये प्रसिध्द होताच मी,भारत गजेंद्रगडकर आणि राजेंद्र बहिेरे यांनी तत्कालिन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करून एका दिवसात स्थगिती मिळवली.त्यामुळे एक कोटीची जमिन वाचवण्यात यश आले.
9 महिन्यापुर्वी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख अध्यक्ष झाले.मला राज्य कार्यकारिणीवर घेेतल्याचे एका पोस्टवर समजले,मी एस.एम.देशमुख यांच्याकडे उस्मानाबादच्या पत्रकार संघाची सर्व लफडी पाठवली,सर्व कागदपत्रे झेरॉक्स करण्यासाठी दीड ते दोेन हजार रूपये खर्च आला.देशमुख यांनी निरीक्षक म्हणून लातूर आणि औरंगाबाद विभागाचेे सचिव विजय जोशी यांना नियुक्त केले.जोशी उस्मानाबादला आले,त्यानंतर त्यांनी उस्मानाबादच्या सर्व ज्येष्ठ लोकांची मते जाणून घेतली,मराठी पत्रकार परिषदेची सध्याची कार्यकारिणी अनेकांना सदस्य करून घेत नाही,आपल्या कार्यालयातील शिपायांना सदस्य करतात परंतु 25 वर्षापासून पत्रकारिता करणार्या माझ्यासारखा मंडळींना डावलतात,अशी तक्रार आम्ही केली.विजय जोशी यांनी उस्मानाबाद मराठी पत्रकार परिषद बरखास्त करावा अशी शिफारस मराठी पत्रकार परिषदेकडे केली,परंतु एस.एम.देशमुख यांनी अंमलबजावणी केली नाही,त्यावरून एस.एम.देशमुख आणि माझे तात्वीक मतभेद झाले.एस.एम.देशमुख आणि माझी तशी ओळख त्यांनी कृषीवल सोडल्यापासून,आमचे सतत फोनवर बोलणे असायचे.उस्मानाबादच्या प्रकरणावरून मतभेद झाले,मी शांत बसलो.भारत गजेंद्रगडकर नेहमी म्हणत होते,त्या एस.एम.काही करणार नाही,पण एक विश्वास होता,तो त्यांनी घालवला.
नंतर 6 सप्टेंबर 2016 रोजी माझ्या गावकरी कार्यालयावर हल्ला झाला.संपादक अनिल फळे,सहाय्यक संपादक दिनेश हारे त्याच दिवशी उस्मानाबादला आले,सोलापूरचे सुराज्यचे संपादक राकेश टोळ्ये आणि सोलापूरची पत्रकार मंडळीही आली,मी जेलमध्ये असताना माझे जीवलग मित्र संजय वरकड आणि विक्रांत पाटील माझ्या घरी भेटून गेले,परंतु एस.एम,देशमुख उस्मानाबादला काही आले नाहीत,उलट माझ्या मुलीला तुझ्या पप्पाच्या विरोधात स्थानिक पत्रकार विरोधात असल्याचे सतत सांगत होते.हे स्थानिक पत्रकार म्हणजे एस.एम.देशमुख यांच्याच मराठी पत्रकार संघाचे पत्रकार,इतर संघटनेचे कोणीही विरोधात नव्हते.एस.एम.देशमुख यांनी माझ्या हल्लाबाबत पोस्ट लिहितानाही मतभेद असल्याचा उल्लेख केला,ते लिहिणे जरूरी नव्हते,तसेच उस्मानाबादच्या पत्रकारांना आवर घालण्याची जबाबदारी त्यांची होती.
उस्मानाबाद शहर वगळता परंडा,कळंब,उमरगा येथे निषेध झाला,तसेच महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात आणि जिल्ह्यात याबाबत निवेदन दिले गेले,मोर्चाही काढण्यात आला,ते केवळ अनिल फळे आणि संजय वरकड यांच्यामुळे आणि माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी .मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा कार्यक्रम अनिल फळे आणि संजय वरकड यांनीच आखला,औरंगाबादची सर्व संपादक मंडळीही सहभागी झाली होती.एस.एम.देशमुख यांनाही बोलावले होते.
उस्मानाबादला मोर्चा काढण्याचे नियोजन संजय वरकड यांनी केले होते,परंतु एस.एम.देशमुख यांनी उस्मानाबादची पत्रकार मंडळी विरोधात असल्याचे भासवून तो बेतच रद्द केला.
मी एस.एम.देशमुख यांना जवळचा म्हणून एस.एम.देशमुख यांचे अनेक विरोधक माझे विरोधात गेले.एस.एम.देशमुख यांनी हिरीरीने भाग घेतला नाही,हे मान्यच करावे लागेल.
माझ्यावरील हल्ला हा माझ्या वैयक्तीक कारणामुळे नव्हता.दोन नंबरचे धंदे करणारे आणि भ्रष्ट पोलीस अधिकार्यांनी षडयंत्र रचून केलेला हा कार्यक्रम होता,त्यात मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न असलेल्या उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी तेल ओतले,त्याचे कारण वर नमूद केले आहेच.
मला जामिन मिळाल्यानंतर पुण्यात स्थायिक झालो आहे,पुण्यात येवून सहा महिने होत आले आहेत.9 महिन्यापुर्वी रोज बोलणारे एस.एम.देशमुख यांनी मला एकदाही फोन केला नाही.तशी खंत मी किरण नाईक,विनोद जगदाळे यांच्याजवळ अनेकवेळा बोलून दाखवली.
एस.एम.मला बोलत नाहीत याचे मला आता काहीच वाईट वाटत नाही.परंतु ज्यांच्यासाठी आपण जीवाचे रान केले त्यांनी इतक्या लवकर विसरावे याची खंत नक्कीच आहे.
एस.एम.देशमुख यांच्या विरोधात एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.ज्यांनी त्यांच्या विरोधात लिहिली त्यांनी माझा उल्लेख केला आहे,त्याला उत्तर देताना एस.एम.यांनी यांनीही माझा उल्लेख केला आहे.यात मी भरडला जातोय.एस.एम.चे विरोधक मी एस.एम.चा खंदा समर्थक मानतात.एस.एम.मला आता समर्थक मानत नाहीत.
पण मी इतका कृतघ्न नाही की एस.एम.देशमुख यांच्या विरोधात मोहीम राबवावी.मी ते कधीच करणार नाही कारण माझ्या रक्तात तो गुण नाही,फक्त वस्तुस्थिती मांडली आहे.बाकी काही नाही.
माझे पुर्ण नाव सुनील मधुकर ढेपे आहे.मीही एस.एम.ढेपे आहे परंतु मी सुनील ढेपेच नाव लावतो कारण मला एस.एम.व्हायचे नाही.
एम.एम.देशमुख यांच्या पुढील लढ्यास शुभेच्छा.
सुनील ढेपे
पत्रकार
( मुळचा उस्मानाबादचा.सध्या मुक्काम पुणेे )
# 9420477111 & 9922278922