वेब मीडियाविषयी प्रशिक्षण !

झी २४ तास, त्यानंतर मी मराठी, महाराष्ट्र १ मध्ये अनेक वर्ष अँकर म्हणून काम केलेल्या पंकज इंगोले यांनी पुण्यात नळ स्टॉप ( कर्वेनगर रोड ) येथे CALLIDUS Media & Arts Acodemy सुरु केली आहे.
त्यात अनेक विद्यार्थी घडत आहेत.विशेषतः टीव्ही मीडियात न्यूज अँकरिंग कशी करावी, याचे थेट प्रशिक्षण दिले जाते. पंकज आणि त्यांची पत्नी विशेष परिश्रम घेत आहेत.
प्रिंट, टीव्ही मीडिया नंतर आता वेब मीडिया अस्तित्वात आला आहे.विद्यार्थ्यांना वेब मीडियाचे प्रशिक्षण देण्यासाठी आज दि. ९ सप्टेंबर ( शनिवार ) रोजी मला निमंत्रित करण्यात आले होते.
दुपारी दोन ते साडेचार या वेळेत विद्यार्थ्यांना वेब मीडियाविषयी माहिती देवून, वेबसाईटवर बातम्या अपलोड कश्या कराव्यात याचे थेट प्रशिक्षण देण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांच्या शंका- कुशंकाचे निरसन करण्यात आले. तसेच त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अडीच तास कसे गेले हे कळलेच नाही.
म्हणतात ना, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, तसेच झाले. माझ्याकडे वेब मीडियाविषयी जितके ज्ञान आहे, ते विद्यार्थ्यांना दिले. याबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले, याचा आनंद मला नक्कीच आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल पंकज इंगोले यांचे आभार !


- सुनील ढेपे