पत्रकारांचा खरा दुश्मन पत्रकारच !


पत्रकारांचा खरा दुश्मन पत्रकारच आहे.एखादा पत्रकार प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्याला बदनाम करण्याचे आणि त्याला आयुष्यातून उठवण्याचे काम पत्रकारच करत आहेत.माझे दुश्मन हे पत्रकारच आहेत.त्यांनी मला नेहमी आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
माझ्यावर आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले ते पत्रकारांनीच दाखल केले आहेत...
सन 2004
महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये तीन हजार रूपयावर वसूली प्रतिनिधी म्हणून काम करणारा वसुली एजंट अचानक पत्रकार झाला.त्याची एका दैनिकाच्या जिल्हा प्रतिनिधीपदी निवड झाली.त्याचे कार्यालय बस स्टॅन्डच्या बाजूला गुरू बारच्या शेजारी होते.भीमनगरमधील तीन तरूणांनी त्याची कार्यालयाची मोडतोड केली.त्या घटनेशी माझा काडीचाही संंबंध नसताना त्या प्रकरणात माझे नाव गोवले.
हल्ला करणारे सांगत होते,सुनील ढेपे यांचा काहीही संबंध नाही.तरीही पोलीसांनी त्याच्या सांगण्यावरून माझ्याविरूध्द गुन्हा नोंद केला.त्याच्या आदल्या दिवशी याच वसुली एजंटाने आमच्या इंटननेट कॅफेमध्ये ब्यू फिल्मची सीडी ठेवून त्याने पोलीसांस रेड मारण्यास सांगितले.मात्र स्वामी समर्थ कृपेने ती सीडी आम्ही दूर फेकून दिल्याने आमच्यावर काहीच कारवाई झाली नव्हती.नंतर त्या खोट्या गुन्ह्यातून माझी निर्दोष मुक्तता झाली.
खोटा गुन्हा दाखल करणारा हा वसूली एजंटावर कौटुंबिक कलहामुळे विष पिण्याची पाळी आली तर खोटा गुन्हा दाखल करणारा पोलीस निरीक्षक लाच घेताना पकडला गेला आणि नंतर त्यास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली नंतर तो पोलीस दलातून बडतर्फ झाला.
इतकेच काय तर या जिल्हा प्रतिनिधीस युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बदडून काढले,एका पोलीस निरीक्षकांनी ठो ठोकून बेड्या घालून कोर्टापर्यंत वरात काढली होती.त्याचबरोबर किमान 7 तेे 8 गुुन्हेे त्याच्यावर दाखल आहेेत.
2011-2012
मी आणि इतर दोघे मिळून एक न्यूज पोर्टल काढले होते.त्यांचे काही पत्रकारांनी कान भरले.या दोघांनी माझ्याबरोबर पार्टनरशिप तोडली आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला,हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ आहे.नंतर त्यांचे न्यूज पोर्टल अवघ्या सहा महिन्यात बंद पडले तर मी लगेच उस्मानाबाद लाइव्ह न्यूज पोर्टल काढून आजपर्यंत चालू ठेवले,माझे कोणतेही काम किंवा यश इतर पत्रकारांना खुपत नाही,हेच यातून दिसून आले.
2016
6 सप्टेंबर 2016 रोजी आमच्या कार्यालयावर हल्ला करून नंतर आमच्याविरूध्द खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.त्यात बीडहून प्रसिध्द होणार्‍या एका ब्लॅक व्हाईट दैनिकाचा वसुली एजंट आघाडीवर होता.मला अटक झाल्यानंतर त्याच्या जिल्हा प्रतिनिधीने माझ्याविरूध्द बदनामीकारक मजकूर लिहिला होता.
त्याचा इतिहास.
आमचे कार्यालय पुर्वी समर्थनगरमध्ये होते.त्याच्या वरती त्याचे कार्यालय होते.त्याने त्याची मैत्रिण ऑफीसमध्ये आणून ठेवली होती.त्याची वार्ता त्याच्या पत्नीस लागताच,त्याची पत्नी त्याच्या ऑफीसमध्ये आली आणि त्याच्या मैत्रिणीबरोबर केस पकडून जोरजोरात भांडण करू लागली.ते भांडण मी सोडवले आणि त्यांना शांत केले होते.
नंतर त्याने घरी गेल्यानंतर पत्नीस बेदम मारहाण करून माहेरास हाकलून लावले.त्यामुळे त्याच्या पत्नीने शिराढोण पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला होता,त्याची बातमी अनेक वृत्तपत्रात प्रसिध्द झाली होती.त्याचे बिंग मला माहित असल्यामुळे त्याने माझ्याविरूध्द माझ्या खोट्या प्रकरणात गरळ ओकली.त्याचा जो वसुली एजंट आहे,त्यानेही बायकोस हाकलून लावले आहे.सध्या तो कुठे राहतो,याचा पुरावाच आमच्याकडे आहे.
त्याच्या आडून जोे पोस्ट लिहीत होता,त्याच्याविरूध्द वाहतूक पोलीसास मारहाण करणे,हुंंडा लुबाडून चित्रफित तयार करणे असे चार गुन्हे नोंद आहेत..त्याची कुंडली माझ्याकडे आहेे.
जे मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात,त्यांनी पहिले आत्मपरिक्षण करावे,रोज सकाळी आरश्यात डोकावून पहावे,मग कळेल आपण कोणत्या लायकीचे आहोत...दुसर्‍याकडे एक बोट करत असताना स्वतःकडे चार बोटे असतात,हे लक्षात ठेवावे...
यांनीही मला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी मी बदनाम होणार नाही,यांच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही...
बस्स सध्या तरी इतकेच...
नंतरचा भांडाफोड लवकरच...

@ सुनील ढेपे