शेळी होवून जगण्यापेक्षा....


माझ्याकडे नेहमीप्रमाणे वेबसाईट उपलोड कशी करावी आणि वेबसाईटचे आर्थिक गणित हा विषय होता. प्रशिक्षणार्थीना समजेल अश्या साध्या आणि सोप्या भाषेत ते सांगणे हे कौशल्य आहे..ते कौशल्य आता हस्तगत केल्यामुळे पूर्वीसारखे आता दडपण येत नाही.हसत खेळत दीड तास कसा गेला हे कळले सुद्धा नाही.प्रशिक्षणार्थीच्या प्रश्नाला उत्तर देताना हजरजबाबीपणा लागतो, तो आता अनुभवातून आला आहे.
उस्मानाबाद सोडताना मला खूप दुःख झाले होते, पण आता समाधान वाटतय. कारण पुण्यात राहूनही उस्मानाबादचे प्रश्न मांडत आहे, अधून मधून उस्मानाबादला जावून स्वतः प्रश्न हाताळत आहे.उस्मानाबाद माझ्या हृदयात आहे. पण त्याचबरोबर स्वतःला, कुटुंबाला वेळ देत आहे. शिवाय पुण्यातील विचारवंताबरोबर वेळ घालवून आणखी ज्ञान प्राप्त करत आहे. उंच भरारी घेत आहे. सागरात पोहताना आनंद वेगळाच असतो...
धन्यवाद, ज्यांनी माझ्यावर खोटी केस केली. त्यांच्यामुळे आज पुण्यात स्थायिक झालो. वाईटातून चांगले होते, ते काही खोटे नाही.. चांगले काम करताना आणि प्रस्थापित लोकांविरुद्ध लढताना, प्रवाहाविरुद्ध पोहताना त्रास तर होणारच... पण १०० दिवस शेळी होवून जगण्यापेक्षा १ दिवस वाघ होवून जगण्यातच मजा आहे. ती मजा मी घेत आहे.

पुण्यात कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्ट्स अकॅडमीच्या वतीने दुसरी राज्यस्तरीय डिजिटल मीडिया कार्यशाळा पार पडली. हॉलची क्षमता ५० असल्याने त्यासाठी ५० जणांना प्रवेश देण्यात आला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि गोव्यातून प्रशिक्षणार्थी आले होते.
धन्यवाद...
सुनील ढेपे
.....

पुणे - कँलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्ट्स अकॅडमीच्या वतीने शनिवारी दुसरी राज्यस्तरीय डिजिटल मीडिया कार्यशाळा पार पडली. यात सकाळचे डिजिटल संपादक सम्राट फडणीस,उस्मानाबाद लाइव्ह आणि महाराष्ट्र लाइव्हचे संपादक सुनील ढेपे, मुक्त पत्रकार सचिन परब,आयटी इंजिनिअर आणि सोशल मीडिया तज्ञ विनायक पाचलग, थोडक्यात वेबसाईटचे कृष्णा वरपे यांनी मार्गदर्शन केले.
वेबसाईट आणि ईपेपर अपलोड कसा करावा, वेबसाईटचे आर्थिक गणित यावर सुनील ढेपे यांनी दीड तास मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस महाराष्ट्र तसेच गोव्यातील जवळपास 50 प्रशिक्षणार्थीनी हजेरी लावली होती....
गोव्यातील चार पत्रकार या कार्यशाळेस हजेरी लावून, गोव्यात डिजिटल मीडिया कार्यशाळा घेण्याचा मनोदय व्यक्त केला ....