जिद्द आणि चिकाटी

उस्मानाबाद लाइव्हवर आता व्हिडीओ न्यूज सुरू करण्यात आल्या आहेत.त्यासाठी व्हिडीओ 3 CCD कॅमेरा घेतला आहे.लवकरच आणखी एक HD कॅमेरा घेत आहे.व्हिडिओ कॅमेरा हाताळण्याचा कसलाही पुर्व अनुभव नव्हता.केवळ एक तासांच्या आत सर्व शिकलो,त्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक मिडियातील पत्रकार मित्रांकडून टीप्स् घेतल्या.
कोणीच जन्मत: शिकून येत नाही,फक्त जिद्द आणि चिकाटी पाहिजे.उस्मानाबाद लाइव्ह अधिक सक्षम करण्याचा हा प्रयत्न आहे.प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर आणखी एक मीडिया आकार घेत आहे,त्याचे नाव आहे,वेब मीडिया...
येत्या पाच वर्षात भांडवलाअभावी आणि गळेकापू स्पर्धेमुळे अनेक वृत्तपत्रे बंद पडणार आहेत.त्याची जागा ई-पेपर घेणार आहेत.म्हणूनच आम्ही तीन वर्षापुर्वीच ऑनलाईन न्यूज वेब पोर्टल सुरू केले.तीन वर्षात पाच लाख वाचकांनी या वेब पोर्टलला भेट दिली.मी नेहमीच काळाबरोबर चालत आलो आहे.माझ्या वयाच्या अनेक पत्रकार मित्रांना हातात माऊस धरता येत नाही.काळाबरोबर चला,तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.
उस्मानाबाद लाइव्हवर ज्या बातम्या आणि लेख प्रकाशित होतात,त्या मी स्वत: टाईप करतो.टाईपिंगची स्पीड जबरदस्त वाढली आहे.
कोणतीही बातमी क्षणार्धात जगभर पोहचविण्याचे उस्मानाबाद लाइव्ह हे उस्मानाबादकरांचे हे ऐकमेव माध्यम आहे.बातमी,फोटो, व्हिडीओ,लेख क्षणभरात जगभरात वाचकांना वाचण्यास मिळत आहेत.
आता प्रत्येकाच्या हातात android मोबाईल आला आहे.आमची न्यू लूक वेबसाईड वाचकांच्या मोबाईल आकारानुसार आकार घेते,त्यामुळे वाचकांना वेबसाईड वाचण्यास अधिक सुलभ जाते.
जगभरात कोठेही बसून कॅम्प्युटर,लॅपटॉप आणि आता मोबाईलवर वाचत रहा - उस्मानाबाद लाइव्ह

- सुनील ढेपे
मुख्य संपादक,उस्मानाबाद लाइव्ह
www.osmanabadlive.com