धाराशिव लाइव्ह - एक लाख सदस्य आणि सिल्व्हर बटन !

 


सलग दहा वर्षे  काम केल्यानंतर  दैनिक एकमतचा स्वतःहून राजीनामा दिला आणि  त्यानंतर व्यवसाय म्हणून स्वतःचे इंटरनेट कॅफे सुरु केले. . इंटरनेटच्या माध्यमातून काही वेबसाईट पहात असताना, स्वतःची न्यूजची वेबसाइट असावी, अशी कल्पना सुचली आणि  सन २०११ मध्ये स्वतःचे धाराशिव लाइव्ह हे डिजिटल चॅनल ( वेब,  फेसबुक पेज, युट्युब चॅनल ) सुरु केले. त्यावेळी धाराशिवसह राज्यभरातील अनेक पत्रकारानी माझी टिंगलटवाळी केली. मी मेन स्टीमचा पत्रकार नाही म्हणून निंदा केली. माझ्या या कामावर अनेकजण हसले, पण आज तेच लोक माझ्या पाऊलावर पाऊल टाकून वेबसाईट आणि  युट्यूब चॅनल काढत आहेत.


परंतु , लाख आले तरी  धाराशिव लाइव्ह हे डिजिटल मीडियात सदैव अग्रेसर आहे. आमचे चॅनल कुणाचेही मुखपत्र नाही.आमच्याकडे   कोणतीही बातमी  दाबली जात नाही . निर्भीड, निष्पक्ष, सडेतोड हा आमचा बाणा आहे. आमच्या बातमीवर वाचकांचा विश्वास आहे. आम्ही कधी पॉकेट जर्नालिझम केली नाही. बातमीसाठी पैसे घेतले नाहीत. खोट्या बातम्या दिल्या नाहीत.इतरांसारखे  काळे धंदे केले नाहीत. ओली पार्टी केली नाही. बार आणि बारी मध्ये कधी जात नाही. गुत्तेदारी केली नाही. आम्ही पत्रकारिता धर्म मानतो, त्याचा कधी  धंदा केला नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक गोर - गरीब लोकांना न्याय मिळवून दिला. अनेकांना मदतीचा हात दिला.  सत्य बातम्या देतो म्हणून मला अनेकदा एकटे पाडण्यात आले,  खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, पण मी कधी हरलो नाही. त्यातून सहीसलामत निघालो. सोने जसे उजळून निघते, तसे निघालॊ. ज्यांनी षडयंत्र केले , काड्या केल्या ते  स्वतःहून आज तोंडघशी पडले आहेत. 

असो, धाराशिव लाइव्ह वेबसाईटचे  आणि  युट्युब चॅनलचे धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि देश - विदेशात वाचक/ प्रेक्षक  आहेत. आमच्या युट्युब चॅनलने एक लाख सब्सक्राईबचा टप्पा पार केला आहे आणि आम्हाला अभिमान आहे की YouTube कडून सिल्व्हर बटन मिळालं आहे. सिल्व्हर बटन  प्राप्त करणारे धाराशिव जिल्ह्यातील हे पहिलेच एकमेव चॅनल आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे हे शक्य झाले आहे..  हे यश आपल्या सर्वांचे आहे - आमच्या प्रिय प्रेक्षकांचे, ज्यांनी सदैव आमच्या व्हिडिओला पसंती दिली, लाईक केले आणि शेअर केले.

आम्ही नेहमीच आपल्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू. आपण आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं याबद्दल धन्यवाद.

पुढे जात असताना, आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची आणि प्रेमाची अपेक्षा आहे.

धन्यवाद!

सुनील ढेपे

संपादक, धाराशिव लाइव्ह


#धाराशिवलाइव्ह #एकलाखसदस्य #सिल्व्हरबटन #धन्यवाद #आभार