Thank You LTI
आमची लाडकी लेक मयुरी ढेपे LTI ( Larsen & Toubro Infotech ) या नामांकित कंपनीमध्ये सिनियर सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून जॉईन होवून आज बरोबर तीन महिने झाले आहेत. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर आई - वडिलांना मोफत कोरोना लसीकरण ठेवले आहे.
मयुरी आणि समीर यांनी मुंबईच्या LTI कंपनीत चार दिवसापूर्वी तर आज ( २ जून ) मी आणि दीपाने पुण्यातील हिंजवडीतील कंपनीच्या ऑफिसमध्ये कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला.
ऑफिस मध्ये पाऊल ठेवल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात आम्हाला लस मिळाली. कसलीही घाई- गडबड नाही, अत्यंत शिस्तीमध्ये कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पालकांना लस दिली जात होती. लस घेतल्यानंतर एका हॉलमध्ये सर्वाना अर्धा तास देखरेखीखाली बसवण्यात आले.
अर्धा तासात कसलाही त्रास जाणवला नाही. त्यानंतर आम्ही चहा- बिस्कीट घेऊन कंपनीत खास Covid-19 Vaccination फोटो काढले. कंपनीत पाऊल ठेवल्यापासून बाहेर निघेपर्यंत उपस्थित कर्मचारी अत्यंत नम्रपणे सर्व माहिती देत होते. ऑफिसचा सर्व परिसर, आतील व्यवस्था मी आणि दीपा मोठ्या कुतूहलाने पाहात होतो, मुलगी मोठ्या कंपनीत असल्याचा आम्हाला एक प्रकारचा अभिमान वाटत होता.
४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरु होवून तीन महिने झाले तरी, पुण्यात आजवर मला लस मिळाली नाही.पत्रकार फ्रंटवर्कर असल्याचे अजून तरी सरकराने मान्य केले नाही. त्यामुळे माझ्यासारखे पत्रकार जीव मुठीत धरून काम करीत आहेत. मुलगी मोठ्या कंपनीत असल्यामुळे निदान तिच्यामुळे तरी आम्हाला लस मिळाली. मुलीचे जॉब लोकेशन मुंबई असतानाही कंपनीने पुण्यात आम्हाला लस दिली. त्याबद्दल कंपनीचे आभार.
Old Vibe.
New Feels.
Good Purpose.
Same Heart.
Thank You LTI.

- सुनील ढेपे