वय झालं तरी आपण कायम विद्यार्थी ...

 गेल्या ३० वर्षांपासून मी पत्रकारितेत कार्यरत आहे आणि त्यातील दहा वर्षे डिजिटल मीडियात सक्रिय आहे. पत्रकारितेचा अभ्यासक्रम जेव्हा मी पूर्ण केला तेव्हा डिजिटल मीडिया नव्हता. इंटरनेटच्या आवडीमुळे मी डिजिटल मीडियात आलो पण त्याची परीक्षा कधी दिली नव्हती.

आंतरराष्ट्रीय रॉयटर्स या वृत्तसंस्थेने डिजिटल पत्रकारितेविषयीचा एक अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्यानंतर एक ऑनलाईन परीक्षा होते. कुतूहल म्हणून मी परीक्षा दिली आणि पास झालो आणि या वृत्तसंस्थेने प्रमाणपत्र बहाल केले.
मी कला ( आर्ट ) शाखेचा विद्यार्थी. इंग्रजी तशी कच्ची. पण आता हळूहळू पक्की होत आहे. परीक्षा इंग्रजीत आहे. तरीही सहज पेपर सोडवला.


तुम्हाला जर हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर खालील लिंकवर जा