जे नवं ते आम्हाला हवं...
मराठवाड्यातील उस्मानाबाद हा मागास जिल्हा म्हणून ओळखला जात होता.मात्र या
जिल्ह्याला हायटेक बनवण्याचे काम आम्ही सातत्याने केले आहे.सन २०००मध्ये
ज्यांना इंटरनेट म्हणजे काय हे माहित नव्हते,त्यावेळी मुक्तरंग नावाचे
इंटरनेट कॅफे सुरू केले.इंटरनेट कॅफे चालवत असताना,सतत डोक्यात आपलीही
वेबसाईट असावी,अशी इच्छा मनात आली.त्यानंतर साडेचार वर्षापुर्वी आम्ही
उस्मानाबाद लाइव्ह नावाचे न्यूज पोर्टल सुरू केले.लोकांना वेबसाईट म्हणजे
काय,हे जेव्हा माहित नव्हते,तेव्हा वेबसाईट सुरू करण्याचे धाडस केले.आता कुठे इंटरनेटचा प्रचार खेड्यापाड्यापर्यंत झाला आहे.
आता प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला आहे.आता अॅप्सचा जमाना सुरू झालेला आहे.काळाची गरज ओळखून आम्ही काही महिन्यापुर्वी उस्मानाबाद टुडे नावाचे अॅप्स सुरू केले.त्यानंतर मोबाईल डायरी सुरू करण्याची कल्पना सुचली आणि ती लगेच अंमलात आणली.या मोबाईल डायरीच्या माध्यमातून शासकीय कार्यालय,अधिकारी,पदाधिकारी,आमदार,खासदार,पत्रकार,वकील,पोलीस,पत्रकार,शाळा - महाविद्यालय,हॉस्पीटल,हॉटेल्स,लॉज,उस्मानाबाद मार्केट यांचे नंबरर्स तसेच रेल्वे वेळापत्रक देण्याचे काम केले आहे.त्याचबरोबर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे लाईव्ह दर्शन घेता येणार आहे.
उस्मानाबाद जिल्हा न्यायालयातील जवळपास ५६८ वकिलांचे नंबरर्स,उस्मानाबाद नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांचे नंबर,उस्मानाबाद शहरातील सर्व पत्रकारांचे नंबरर्स अपडेट करण्यात आले आहेत.अजूनही काम सुरू आहे.जसे जसे नंबर उपलब्ध होतील,तसे अपडेट करण्यात येतील.आता आपणास फोन नंबर सेव्ह करण्याची गरज भासणार नाही.एका क्लीकवर हे आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
उस्मानाबाद मोबाईल डायरी हे अॅप्स असून,ते आपल्या स्मार्ट फोनच्या गुगल प्लेस्टोअर्समध्ये जावून मध्ये डाऊनलोड करू शकता.त्यासाठी एकदम साधी पध्दत आहे.
गुगल प्लेस्टोअर्स Open करा. Osmanabad Diary सर्च करा आणि हे अॅप्स डाऊनलोड करा.त्यानंतर उस्मानाबाद डायरी ऑयकॉन आपल्या मोबाईलवर डाऊनलोड होतील.त्यानंतर त्यावर क्लीक केल्यानंतर सर्व नंबरर्स आणि लिंक आपल्याला उपलब्ध होतील.टु जी इंटरनेट स्पीडवरही हे अॅप्स अत्यंत जलदगतीने चालणार असल्यामुळे कोणत्याही मोबाईलधारकांची गैरसोय होणार नाही,असा आमचा विश्वास आहे.हे अॅप्स आपणास नक्कीच पसंद पडेल,असा आमचा विश्वास आहे.
सतत नविन काही तरी करण्याचा आमचा नेहमीचा छंद आहे.यातून चार पैसे मिळतील,अशी अपेक्षा कधीच केली नाही.केवळ उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांची सोय व्हावी म्हणून आमची सतत धडपड असते.आमले प्रेम,आपले पाठबळ आणि सदिच्छाच्या जोरावर के काम सुरू आहे.
आमची कोणाबरोबर स्पर्धा नाही किंवा कोणाबरोबर इर्षा नाही.नेहमीच आम्ही नविन करीत आलो आहोत.कोणतीही कल्पना सुचली की,ती पुर्ण होईपर्यंत आम्हाला चैन पडत नाही.कामाचे वेड काय असते,याचा अनुभव आम्ही सतत घेतला आहे.
आपले नेहमीप्रमाणे सहकार्य अपेक्षित आहे.

सुनील ढेपे
मुक्तरंग मल्टीमीडिया प्रा.लि.
उस्मानाबाद
मो.9420477111
मुक्तरंग मल्टीमीडिया प्रा.लि.
उस्मानाबाद
मो.9420477111