उस्मानाबाद लाइव्हचा 'न्यू लूक'.....

उस्मानाबाद लाइव्ह हे ऑनलाईन न्यूज वेब पोर्टल घटस्थापनेच्या दिवशी (५ ऑक्टोबर) तीन वर्षे पुर्ण करून, चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे. चौथ्या वर्षात पदार्पण करताना,उस्मानाबाद लाइव्ह न्यू लूक घेवून,आपणासमोर येत आहे,ही आमच्यासाठी आणि आमच्या जगभरातील असंख्य वाचकांसाठी आनंदाची बाब आहे.
सन १९८७ पासून मी पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे.अणदूरमध्ये केसरी या वृत्तपत्राचा वार्ताहर तीन वर्षे काम केल्यानंतर, लातूरमध्ये काम करण्याची संधी केसरीने दिली.मात्र १९९१ मध्ये एकमत सुरू झाला आणि उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून उस्मानाबादला आलो.१९९१ ते १९९९ पर्यंत एकमतचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर,स्वतंत्र व्यवसाय करण्याच्या दृष्टीने एकमतचा राजीनामा दिला,पण पत्रकारितेचा मुळ पिंड मला स्वस्थ बसू देत नव्हता.त्यामुळे पुन्हा केसरीचे काम सुरू केले.केसरीच्या जोडीला सह्याद्री सुरू झाला.नंतर चित्रलेखामध्येही लेखन सुरू केले.
मात्र सन २००४ मध्ये पत्रकारितेतील विरोधकांनी माझ्याविरूध्द मोठे षडयंत्र केले.त्यामुळे काही वर्षे पत्रकारितेतून बाजूला फेकलो गेलो होतो,मात्र या विरोधकांवर मात करीत गेल्या तीन वर्षापासून, पुन्हा एकदा पुर्वपदावर आलो आहे.
माझ्या पत्रकारितेची कारकिर्द कशी आहे,हे मी सांगण्याची गरज नाही.उस्मानाबादची जनता हुशार आहे,ही जनताच बरोबर मुल्यमापन करते. त्यामुळे उस्मानाबादच्या पत्रकारितेतील ध्रुतराष्ट्र आणि त्यांच्या दुर्योधन पुत्राने त्यांच्या चिटो-या पेपरमध्ये कितीही खोटेनाटे छापले तरी,सत्य हे शेवटी सत्यच असते.
पत्रकारितेच्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत ३० हून अधिक पुरस्कार मला मिळालेले आहेत.जिल्हा मराठी पत्रकार संघात दुर्योधनाने भ्रष्ट्राचार करून,तो गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला होता,पण भारत गजेंद्रगडकर,राजेंद्र बहिरे आणि माझ्यामुळे हा संघ वाचला.याच संघाच्या राज्य कार्यकारिणीवर माझी निवड झाली आहे.माझी निवड ध्रुतराष्ट्र आणि त्याच्या दुर्योधन पुत्रासाठी सनसनीत चपराक होती.लगेच माझ्याविरूध्द अंध पिता-पुत्रांनी मराठी पत्रकार परिषेदच्या पदाधिका-याकडे खोट्यानाट्या तक्रारी केल्या,पण वरची मंडळी दुधखुळी नसल्यामुळे या पिता-पुत्राची डाळ शिजली नाही.असो,या पिता - पुत्राचा सविस्तर समाचार नंतर कधी तरी घेवू...
तीन वर्षापुर्वी जेव्हा तिघांमध्ये आज उस्मानाबाद नावाचे ऑनलाईन वेब पोर्टल सुरू केल्यानंतर,याच पिता-पुत्राने त्यात विष कालविण्याचे काम केले.मात्र त्यांच्या नाकावर टिच्चून,उस्मानाबाद लाइव्ह सुरू केले.ऐवढेच नाही तर सलग तीन वर्षे चालविले.आता चौथ्या वर्षात पदार्पण करताना,न्यू लूक केला आहे.कितीही वाईट चिंतले म्हणजे,आमचे काहीच वाकडे होवू शकत नाही,याचे भान धु्रतराष्ट्र आणि दुर्योधनाने ठेवावे.लोकांसाठी खड्डा खंदला की,एक दिवस आपणच त्या खड्डयात पडतो,याची जाणीव त्यांनी ठेवावी.ज्यांनी - ज्यांनी आमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला,तेच आता उघडे पडले आहेत.
कोणी आडवा आला म्हणून,कोणाची प्रगती खुंटत नसते,मांजर आडवे गेल्यासारखा हा प्रकार आहे.मांजर किती जरी डोळे झाकून दुध पित असले तरी,लोकांना ते दिसते,तेव्हा मांजरांनी आपल्या लायकीप्रमाणे वागावे,ऐवढेच जाता - जाता सांगणे आहे.
उस्मानाबाद लाइव्ह हे उस्मानाबादकरांच्या समस्या आणि प्रश्न मांडण्यासाठी सुरू केलेले व्यासपीठ आहे.गेल्या तीन वर्षात अनेक प्रश्नांचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे.हे न्यूज पोर्टल प्रचंड तोट्यात असतानाही ते आम्ही चालू ठेवले आहे.या वेब पोर्टलला उस्मानाबाद शहर,जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्य,देश आणि विदेशातील वाचक आवडीने या वेबपोर्टलला भेट देत असतात.जुन्या वेब पोर्टलवर वाचकांच्या प्रतिक्रिया वाचल्या असतील,ते आपणास लक्षात येईल.
उस्मानाबाद लाइव्हने चौथ्या वर्षात पदार्पण करताना,आणखी एक महत्वाचा बदल करणार आहे, हा बदल काय आहे,हे लवकरच कळेल.
आपल्या शुभेच्छा आणि आपले सहकार्य असेच कायम राहो,ही अपेक्षा.

सुनील ढेपे